Does using mobile cause cancer saam tv
लाईफस्टाईल

मोबाइलच्या वापरामुळे ब्रेन कॅन्सर होतो का? WHO च्या अभ्यासातून सत्य समोर!

Surabhi Kocharekar

मोबाईलचा अतिवापर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे एका विशिष्ट काळापर्यंत त्याचा वापर करावा. अनेकदा सोशल मीडियावरही मोबाईलच्या वापराने होणार्‍या दुष्पपरिणामांची अफवा पसरवली जाते. मात्र अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा खुलासा केला आहे. WHO च्या अहवालानुसार, मोबाईल आणि ब्रेन कॅन्सर यांचा संबंध नसल्याचं समोर आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी एक अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये जगभरातील अनेक लोकांनी वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यामुळे ब्रेन कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.

संशोधनातून नेमकं काय आलं समोर?

या रिपोर्टमध्ये ऑस्ट्रेलियन 10 देशांतील 11 संशोधकांनी 1994 ते 2022 दरम्यान केलेल्या 63 अभ्यासांचा समावेश आहे. या रिपोर्टमध्ये ब्रेन कॅन्सर, पिट्यूटरी ग्रंथी, लाळ ग्रंथी, ब्लड कॅन्सर आणि मोबाइल फोन, बेस स्टेशन किंवा ट्रान्समीटरमुळे निर्माण होणारा धोका यांचाही अभ्यास करण्यात आला.

कोणताही धोका समोर आला नाही

न्यूझीलंडमधील ऑकलंड युनिवर्सिटीतील कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर मार्क इलवूड यांनी सांगितलं की, या अभ्यासात मोबाईल फोन तसंच टीव्ही यांसारख्या वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, यामध्ये जितके प्रश्न विचारण्यात आले होते, त्यामधून कोणताही धोका असल्याचं समोर आलं नाही.

यापूर्वीही असाच एक रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांनी मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे कोणतंही नुकसान होत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र यासाठी अजून संशोधनाची गरज असल्याचं म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT