Mobile Phones Bacteria
Mobile Phones Bacteria  Saam TV
लाईफस्टाईल

Mobile Phones Bacteria: मोबाईलचा अती वापर करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तज्ज्ञांनी दिलेला अहवाल पाहून पायाखालची जमीनच सरकेल

Ruchika Jadhav

Mobile Phone Bacteria News: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. हाय स्पीड इंटरनेटमुळे मोबाईल वापरण्याचं अतिप्रमाण वाढलं आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच जण फोनमध्ये तासंतास गुंतलेले दिसतात. अशात आता अमेरिकेतील एका शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आणली आहे. (Phones Harm The Skin)

अमेरिकेच्या डॉ. मामिना तुरेगैनो यांनी आपल्या अहवालात फोनच्या वापराविषयी चिंताजनक माहिती समोर आणली आहे. डॉ. मामिना या त्वचा रोग तज्ञ आहेत. त्यांनी आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की, फोनच्या अती वापराने आणि तुम्ही तो कशा प्रकारे वापरता याने तुमच्या आरेग्यावर परिणाम होऊ शकतो. टीकटॉकवरती त्यांनी स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे.

सार्वजनिक शौचालयापेक्षाही फोनवर घातक जंतू

टीकटॉकवर डॉ. मामिना यांचे जवळपास १० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. यात त्यांनी म्हटलं आहे की, फोनवर सतत बॅक्टीरीया विविध प्रकारचे जंतू फिरत असतात. हे जंतू आपल्या त्वचेसाठी फार घातक असतात. एवढेच नाही तर आपल्या अहवालात त्यांनी पुढे म्हटलं की, हे जंतू एखाद्या सार्वजनिक शौचालयात असतात त्यापेक्षाही कितीतरी पटीने घातक असतात.

जेव्हा आपल्याला कोणत्यातरी व्यक्तीचा कॉल येतो आणि ती व्यक्ती फोन उचलून थेट कानाला लावते. त्यावेळी फोनवर असलेले सर्व जंतू (Bacteria) आपल्या त्वचेला स्पर्श करतात. त्वचेतून आपल्या शरिरात जातात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

उपाय काय?

अशा प्रकारच्या जंतूपासून आपला बचाव व्हावा यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील डॉ. मामिना यांनी सांगितले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, अशा समस्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फोन सातत स्वच्छ करा. साध्या पाण्यात अथवा साबणाच्या पाण्यात तुम्ही एखादा रुमाल भिजवून त्याने आपला फोन स्वच्छ ठोवावा. (Latest Tech News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT