Milk Alternatives: Saam Tv
लाईफस्टाईल

Milk Alternatives: दुधाची अॅलर्जी आहे? मग कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे ७ पदार्थ

Milk Alternatives: दुधाची अॅलर्जी असल्यास कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता भरून काढायची आहे? बदाम, सोयाबीन, तीळ, रागी, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.

Shruti Vilas Kadam

Milk Alternatives: दूध हे आरोग्यासाठी अत्यंत पोषक मानले जाते. दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसेच स्नायूंच्या विकासासाठी हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. मात्र, सध्याच्या काळात दूध प्याल्याने अनेकांना अॅलर्जी पोट जड होणे मळमळणे असे त्रास होतात. अशावेळी दूध न पिता शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि प्रोटीन कसे मिळवायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काळजी करू नका! आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक स्वस्त आणि सहज उपलब्ध पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. जाणून घेऊया अशाच ७ पदार्थांबद्दल...

दही

दही हा दुधाचा उत्तम पर्याय मानला जातो. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. तुम्ही रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करू शकता. दही, ताक किंवा लस्सी अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचे सेवन करता येते. जर लैक्टो सिंड्रोम असेल तर अन्य पर्याय ट्राय करु शकता.

सोयाबीन

सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. शरीरातील स्नायूंच्या विकासासाठी प्रोटीन महत्त्वाचे आहे. तुम्ही सोयाबीनची भाजी, सोया चंक्स किंवा सोया मिल्कचा आहारात समावेश करू शकता. बाजारातून सोया मिल्क घेताना त्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिसळलेले आहे का, हे तपासा.

काळा हरभरा

काळे हरभरे हा प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. नियमित आहारात काळ्या हरभऱ्याचा समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. रात्रभर हरभरे भिजवून सकाळी उकडून खाऊ शकता. तसेच, उसळ किंवा चाटदेखील बनवता येते.

डाळी

मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ आणि चणा डाळ यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोजच्या जेवणात वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा. डाळींचे सेवन केल्याने शरीराला प्रोटीनसोबत फायबर आणि इतर पोषक घटकही मिळतात.

शेंगदाणे

शेंगदाणे हा कमी किमतीत मिळणारा पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम असते. तुम्ही भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची उसळ खाऊ शकता. मात्र, शेंगदाण्यांचे अति प्रमाणात खाऊ नका.

तीळ

तीळ हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. हाडांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी तिळ खाणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही तिळाची चटणी, तिळाचे लाडू किंवा भाज्यांमध्ये तीळ घालून खाऊ शकता.

नाचणी

नाचणीला कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानले जाते. यामध्ये कॅल्शियमसोबत फायबर आणि इतर पोषक घटकही असतात. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही नाचणीची भाकरी, डोसा, सत्त्व किंवा दलिया बनवून खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NDA कडे ३२० खासदारांचे समर्थन, तरीही दोन तृतीयांश बहुमतासाठी कसरत; काय आहे संपूर्ण राजकीय गणित?

Maharashtra News Live Update: उसाच्या दरवाढीसाठी राजू शेट्टी मैदानात! सोलापुरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले

LPG Gas Connection : नवीन गॅस कनेक्शन घ्यायचंय? घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Shocking : धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेसचा मृतदेह गोंदियाच्या जंगलात सापडला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT