MHT CET Result  Shiksha
लाईफस्टाईल

MHT CET Result Date 2024:MHT CET चा निकाल कधी होणार जाहीर? अशा पद्धतीने डाऊनलोड करा मार्कशीट

MHT CET Result : एमएचटी सीईटीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Common Entrance Test (महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट) च्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. या उद्याच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाणून तुमचा निकाल मिळवू शकतात. उद्या म्हणजेच १२ जून २०२४ ला एमएचटी सीईटी निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र सीईटी परीक्षा २०२४ ही २२ एप्रिल ते १७ मे यादम्यान घेण्यात आली होती. या कालावधीत २ मे ते १७ मे या कालावधीत पीसीएम ग्रुपची परीक्षा घेण्यात आली होती. तर पीसीबी ग्रुपची परीक्षा २२ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान झाली होती. यावेळी या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते ५ अशा वेळेत घेण्यात आली होती.

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट परीक्षेची सुधारीत उत्तरपत्रिका MHT CET Answer Key 2024 जाहीर करण्यात आलीय. मॉडरेटरने सोडवलेल्या यूनिक प्रश्न आयडींची एकूण संख्या ४७ वरून ५४ झालीय. उमेदवारांना ३६ प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात आलेत. तर १८ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल करण्यात आलेत.

असा चेक करा निकाल

अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा.

त्यानंतर पुढील पेजवर Check MHT CET Result 2024 च्या लिंकवर क्लिक करा.

नंतर विचारण्यात आलेला तपशील भरा.

लॉन इन केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल तपासल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करू घ्या.

काय असते Maharashtra Common Entrance Test

महाराष्ट्र कॉमन प्रवेश परीक्षा (MHT CET), ही एक राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा असते. ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांची निवड करण्यासाठी घेतली जाते. महाराष्ट्र राज्य कॉमन प्रवेश परीक्षा दरवर्षी घेतली जाते.

MHT CET 2024 परीक्षेत 3 प्रश्नपत्रिका असतात. पेपर १ गणिताचा असतो. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा हा दुसरा पेपर तर तिसरी पेपर जीवशास्त्राचा असतो. ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असतो. त्या इच्छुकांनी पेपर १ आणि २ साठी तयारी करावी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या इच्छुकांनी पेपर २ आणि ३ ची तयारी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala To Nighoj : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर पाहा नैसर्गाचे अदभूत सौंदर्य, One Day Trip साठी ठिकाण

Maharashtra Live News Update : प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध - डॉ.शिवानंद भानुसे

Khakhra Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत खाकरा, गरमागरम चहासोबत करा टेस्ट

Aids: किती पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एड्सचा धोका संभावतो?

Maharashtra Politics: देवेंद्र पावले, नाहीतर रामराजे नाईक जेलमध्ये गेले असते; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT