MG Comet EV Saam Tv
लाईफस्टाईल

MG Comet EV : 519 रुपयांमध्ये धावणार महिनाभर! 'एमजी कॉमेट ईव्ही' भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

MG Comet EV Launched: मिनी पण दमदार, आली सर्वात लहान इलेक्ट्रिक कार! 'एमजी कॉमेट ईव्ही' भारतात लॉन्च

Satish Kengar

MG Comet EV launched in India : MG Motor ने भारतात आपली बहुप्रतीक्षित कॉमेट ईव्ही लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 7,98,000 रुपये इतकी ठेवली आहे. या कारची बुकिंग 15 मे पासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर लवकरच याची सुरू होईल.

कंपनीने या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

MG Comet EV launched in India : 519 रुपयांमध्ये महिनाभर धावेल

एमजी मोटरने सध्या कॉमेट ईव्ही केवळ निवडक शहरांमधील डीलरशिपवर उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच्या हालोल प्लांटमध्ये याचे उत्पादन सुरू झाले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार फक्त 519 रुपयांमध्ये महिनाभर धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. (Latest Marathi News)

कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर 230 किमीची रेंज देते. ही 17.3 kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. जी 42 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करते. हे GSEV प्लॅटफॉर्मवर तयार केलेले 4-सीटर वाहन आहे.

MG Comet EV ला 3 ड्राइव्ह मोड आणि 3 KERS मोड मिळतात. यात स्मार्ट स्टार्ट सिस्टम, डिजिटल ब्लूटूथ की, वन टच स्लाइड आणि रिक्लाइन पॅसेंजर सीट, पार्किंग कॅमेरा आहे. यात 17 हॉट स्टॅम्पिंग पॅनेल्स आहेत.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, MG Comet EV ला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल क्लस्टरसह दोन 10.25-इंच स्क्रीन मिळतात. Comet EV मध्ये 55+ कनेक्ट केलेली फीचर्स , 100+ व्हॉईस कमांड, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay आहेत.

सेफ्टीसाठी या EV मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, फ्रंट आणि रियर 3 पॉइंट सीटबेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट सारखे फीचर्स उपलब्ध आहे. याची बॅटरी ३९ बॅटरी प्लस कार सेफ्टी टेस्टमधून निवडण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT