मटार पराठा: हिवाळ्यात प्रत्येकाला गरमागरम नाश्ता खायला आवडतो. त्यात पराठे असतील तर आणखीनच हेल्दी आणि चविष्ठ नाश्ता होतो. पराठ्यांमध्ये अनेक प्रकारचे पर्याय आहेत, कारण थंडीच्या दिवसात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात. त्यातून तुम्ही नाश्त्यासाठी स्वादिष्ट पराठे बनवू शकता.
या मोसमात तुम्ही अनेकदा मुळ्याचा पराठा, फ्लॉवरचा पराठा, मेथीचा पराठा इत्यादी बनवून खात असाल, पण तुम्ही कधी वाटाणा पराठा खाल्लाय का? नसेल तर मटारचा पराठा बनवून नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खा. हिवाळ्यात मटारही मुबलक प्रमाणात मिळतात. फक्त प्रौढच नाही तर लहान मुले देखील मटर पराठे नक्कीच चवीने खातील. तर मग आपण येथे पौष्टिक मटार पराठा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
मटार पराठा तयार करण्याचे साहित्य
हिरवे वाटाणे- 1 कप
मैदा- 1 वाटी
हिरवी मिरची- 2 चिरलेली
कोथिंबीर- 2 टेबलस्पून
कांदा- 1 चिरलेला
जिरे- अर्धा टीस्पून
आले- 1 तुकडा किसलेला
लसूण- 2-3 क्लोज
लिंबाचा रस - अर्धा चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
धनेपूड - अर्धा चमचा
रिफाइंड तेल - पराठे तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
मटार पराठा तयार करण्याची कृती
सर्वप्रथम पिठात थोडे मीठ आणि अर्धा चमचा तेल अॅड करून चांगले मळून घ्या. झाकण ठेवून 10 मिनिटे कणीक तसेच ठेवा. आता मटार सोलून घ्या आणि पाण्यात टाका आणि 5-7 मिनिटे उकळवा. यामुळे ते मऊ होतील. मग गाळणीतून पाणी गाळून घ्या. मटार आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या.
गॅसवर पॅन ठेवा. त्यात तेल अॅड करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे अॅड टाका. जिरे तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा, आले व लसूण अॅड करून परता. दोन ते तीन मिनिटे परतून घेतल्यावर मटार आणि धने आणि गरम मसाला पूड, लिंबाचा रस, कोथिंबीर असे सर्व मसाले अॅड करून चांगले मिक्स करावे. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात वाटाण्याचे मिश्रण भरून गोल पराठ्याच्या आकारात लाटून घ्या.
पॅन गरम झाल्यावर लाटलेला कच्चा पराठा तव्यावर ठेवा. दोन्ही बाजूंनी तो शिजवा. नंतर तेल अॅड करून चांगले सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. चला स्वादिष्ट मटर पराठे तयार आहेत. हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतील, कारण मटारमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यावर लोणी लावून तुम्ही ते खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहासोबत किंवा टोमॅटो सॉस आणि कोथिंबीर चटणीसोबत खाऊ शकता.
Written By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.