Siddhi Hande
प्रत्येकालाच कुरकुरीत अन् खमंग कोथिंबीर वडी खायला आवडते.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर धुवून घ्यावी. त्यानंतर बारीक चिरुन घ्या.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ आणि जिरे टाकून बारी पेस्ट करुन घ्या.
त्यानंतर एका भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाकावे.
या पीठात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वाटलेले मिश्रण टाकावे.
यानंतर हाताने कोथिंबीर वडी वळून घ्यावी. कुकरच्या भांड्यात ठेवून शिजवून घ्या.
कोथिंबीर वडी थंड झाल्यानंतर तुम्ही ती तेलावर परतून घेऊ शकतात.