Maruti Suzuki Fronx Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Suzuki Compact SUV Launch: जबरदस्त मायलेजसह Maruti Suzuki Fronx SUV कार झाली लॉन्च

Maruti Suzuki Fronx SUV Launched In India: यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आलेल्या मारुती सुझुकीने SUV Fronx लॉन्च केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maruti Suzuki SUV Fronx Launches Today: यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आलेल्या मारुती सुझुकीने SUV Fronx लॉन्च केली. या कारची सुरुवातीची किंमत 7.46 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे आणि वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी वेगवेगळ्या किंमती निश्चित केल्या आहेत.

AT आणि अधिक दमदार इंजिनसह टॉप-एंड अल्फा ड्युअल टोनची किंमत 13.13 लाखांपर्यंत आहे. Baleno-आधारित SUV, Maruti Fronx जानेवारीमध्ये ऑटो (Auto) एक्सपो 2023 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती.

आता कंपनीला (Company) आपला SUV पोर्टफोलिओ वाढवून बाजारातील हिस्सा वाढवायचा आहे. मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये Fronx सोबत Jimny सादर केली होती. Jimny अजून लॉन्च झाली नसली तरी कंपनीची दमदार SUV Fronx लाँच झाली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या नेक्सा शोरूममधून खरेदी केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या कंपनीने या वाहनात (Vehicle) कोणते स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स दिले आहेत.

Maruti Fronx SUVमध्ये 2 प्रकारचे इंजिन -

कंपनीने आपली नवीन आणि दमदार SUV Fronx 2 इंजिन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. या इंजिनमध्ये 1.0 लीटर के-सीरीज टर्बो बूस्टरजेट इंजिन मिळेल, पेडल शिफ्टर्ससह 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड AT सारख्या पर्यायांसह येते. याशिवाय 1.2 लीटर ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी इंजिनचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध आहे, ज्यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AGS ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Maruti Fronx SUV वर सुरक्षा आणि इतर फीचर्स -

सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने या पॉवरफुल (Power) SUVमध्ये 6 एअरबॅग, 3 पॉइंट ईएलआर सीटबेल्ट सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय कंपनीने या वाहनात 360 व्ह्यू आणि हाय एंड तंत्रज्ञान (Technology) देखील जोडले आहे. याशिवाय वायरलेस स्मार्टफोन चार्जर, वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

दमदार इंजिन आणि बरेच काही -

कंपनीने हे वाहन 2 इंजिन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. 1.2 लिटर इंजिन 6000rpm वर 66kW ची कमाल पॉवर आणि 4400rpm वर 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. याशिवाय, 1.0-लिटर इंजिन 5500rpm वर 73.6 kW ची कमाल पॉवर आणि 2000 - 4500rpm वर जास्तीत जास्त 147.6 Nm टॉर्क जनरेट करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT