Can diabetics eat mango safely saam tv
लाईफस्टाईल

Type 2 Diabetes: टाइप-2 डायबेटीसच्या रूग्णांसाठी आंबा ठरू शकतो फायदेशीर, अभ्यासात मोठा खुलासा

Can diabetics eat mango safely: मधुमेही रुग्णांनी आंबा खावा का? नव्या संशोधनानुसार योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास, वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळा आला की बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागतो. रसाळ आणि गोड आंबा पाहिला की जवळपास प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु अनेकदा आपल्या मनात प्रश्न येतो की, मधुमेही रूग्णांनी आंबा खावा का? मधुमेही रूग्णांना आंबा खाण्याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आंबा गोड असल्यामुळे तो रक्तातील साखर वाढवू शकतो, अशी भीती अनेकांच्या मनात असते. पण नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाने या समजुतीला वेगळं वळण दिलंय.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आंबा खाल्ल्यास टाइप-2 डायबेटीस असलेल्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे वजन आणि कंबरेचा घेर कमी होण्यासही मदत झाल्याचं संशोधनात दिसून आलंय.

अभ्यासात नेमकं काय आढळलं?

संशोधकांनी मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा खाल्ल्यास रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला. यामध्ये भारतातील लोकप्रिय सफेदा आणि दशहरी या आंब्यांच्या जातींचा समावेश करण्यात आला होता. हा अभ्यास तब्बल आठ आठवडे सुरु होता.

अभ्यासातील सहभागी लोकांना रोज सकाळच्या नाश्त्यात २५० ग्रॅम आंबा देण्यात आला. विशेष म्हणजे हा आंबा ब्रेडच्या जागी देण्यात आला होता. काही आठवड्यांनंतर संशोधकांना आश्चर्यकारक बदल दिसून आले.

रक्तातील साखर नियंत्रणात राहिली

या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांची ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत झाली. ग्लायसेमिक कंट्रोल सुधारल्याचेही दिसून आलं. याशिवाय यामध्ये सहभागी झालेल्याचं वजन आणि कंबरेचा घेर कमी झाला होता.

हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

संशोधनात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. आंबा खाणाऱ्या लोकांच्या शरीरातील HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे योग्य प्रमाणात आंबा खाल्ल्यास त्याचा फायदा केवळ मधुमेहापुरता मर्यादित राहत नाही, असं संशोधकांचं मत आहे.

मग मधुमेहींनी आंबा खावा का?

तज्ज्ञांच्या मते, आंबा पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र तो किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारच्या आहारासोबत खाल्ला जातो, हे महत्त्वाचं आहे. अभ्यासात सहभागी लोकांना नियंत्रित प्रमाणात म्हणजे २५० ग्रॅम आंबा देण्यात आला होता आणि त्याचवेळी ब्रेडसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करण्यात आले होते.

जर आधीच जास्त कार्बोहायड्रेट आणि जास्त कॅलरी असलेल्या आहारात आंबा खाल्ला तर ब्लड 4शुगर वाढू शकतो. पण संतुलित आणि हलक्या कार्बोहायड्रेटयुक्त आहारामध्ये तुम्ही आंब्याचा समावेश करू शकता.

पोटावरील चरबीबाबतही मोठा गैरसमज

दरम्यान, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फक्त क्रंचेस किंवा प्लँक्ससारखे व्यायाम पुरेसे असतात हा समजही तज्ज्ञांनी चुकीचा असल्याचं सांगितलंय. फक्त एका भागासाठी व्यायाम करून त्या ठिकाणची चरबी कमी करता येत नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांचा एकत्रित परिणामच वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: ...अशा लोकांना घरी बोलवणं पडेल महागात, व्हाल बर्बाद

11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश पोर्टल अचानक ठप्प; नेमकं काय घडलं?

Crime News: लग्नाच्या २५ दिवसांनी पत्नीनं गळफास घेतला, नैराश्यात पतीनंही जीवनयात्रा संपवली, जोडप्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक जोराचे वादळी वारे

SCROLL FOR NEXT