मुंबई : संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्याचा वापर त्वचेवर केल्यास चेहऱ्यावर चमक आणते. संत्र्याची साल पिगमेंटेशन, डाग आणि काळे डाग कमी करण्यास मदत करू शकते.
हे देखील पहा-
आपली त्वचा कोरडी किंवा जास्त तेलकट असेल तर आपल्याला संत्र्याच्या सालीचा अधिक फायदा होऊ शकतो. तेलकट त्वचेवर येणारे तेल नियंत्रणात आणण्यासाठी संत्र्याच्या सालीचा उपयोग होऊ शकतो. नैसर्गिकरित्या त्वचेला चमकवण्यासाठी याचा मास्क कसा बनवता येईल हे जाणून घेऊया.
१. आपली त्वचा तेलकट असल्यास आपल्याला ड जीवनसत्त्व व गुलाब पाण्याचा फायदा होईल. हे त्वचेचा थर घट्ट करून चट्टे आणि मुरुम कमी करण्यास मदत करते. संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर घट्ट लावून १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
२. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आपण संत्र्याची साल, चंदन व लिंबाचा रस एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करा व चेहऱ्याला लावा. आपली त्वचा अधिक संवेदनशील किंवा कोरडी असेल तर आपण लिंबाच्या रसाऐवजी पाण्याचा वापर करु शकतो. हा प्रयोग आपण आठवड्यातून किमान दोनदा केल्यास फायदा होतो.
३. नारळाचे दूध, साखर (Sugar) आणि संत्र्याच्या सालीची पावडर घालून बनवलेले स्क्रब नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्वचेच्या मृत पेशी, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून टाकण्यास मदत करते. याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी व हलक्या हाताने मसाज करावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ करुन त्यावर मॉइश्चरायझर लावा. चेहरा उजळण्यास मदत होईल.
४. संत्र्याच्या साली सोबत दह्याचा फेस पॅक बनवल्यास त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. दह्यात संत्र्याच्या सालीची पावडर घालून पेस्ट तयार करा. यात थोडे गुलाबपाणी किंवा नियमित पाणी देखील वापरू शकतो. चेहऱ्यावर हा फेस पॅक लावून तो १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावा.
५. आपल्या त्वचेला (Skin) धूळ, प्रदूषण व ब्लॅकहेड्सपासून रोखण्यासाठी आपण संत्र्याची साल, बेकिंग सोडा व ओटमील स्क्रबचा फेस पॅक चेहऱ्याला लावू शकतो. हा फेस पॅक तयार करुन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.