Maharashtra Corona Update Saam TV
लाईफस्टाईल

Corona Update: दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,87,938 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 18 हजार 967 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 66,21,070 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,87,938 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 18 हजार 967 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 66,21,070 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.02 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,21,477 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,669 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

तसेच राज्यात गेल्या २४ तासात ३४ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण २५ पुणे महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. पुणे ग्रामीण भागात ६ ओमिक्रॉन बाधित आढळून आले आहेत. सोलापुरात २ आणि पनवेलमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता १,२८१ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT