Weight Loss Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Benefits : वजन कमी केल्यास टाळता येऊ शकतो हृदयरोग व मधुमेह ? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

Over Weight Problem : वाढत्या वजनामुळे हृदयरोग व मधुमेह सारखा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

कोमल दामुद्रे

Diabetes And Heart Attack : लठ्ठपणा हा एक आजार असून त्याच्या वाढत्या वजनाने आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाढत्या वजनामुळे हृदयरोग व मधुमेह सारखा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

हे आजार (Disease) टाळण्यासाठी आपल्या वजनावर आपल्याला नियंत्रण ठेवायला हवे. वजन कमी केल्यास हृदयरोग आणि मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त पौष्टिक आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणं, तणावमुक्त होणं आणि पुरेशी झोप घेणं ही आवश्यक आहे. यामुळेही अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत मिळते.

झायनोव्हा शालबी रुग्णालयातील, सल्लागार फिजिशियन, डॉ. उर्वी माहेश्वरी म्हणतात बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्यापिण्याच्या खराब सवयी आणि आनुवंशिकता यांसारख्या कारणांमुळे बहुतेक लोकांच वजन वाढू लागले आहे.

अतिरिक्त वजन असलेल्यांना हृदयविकार (Heart Attack), मधुमेह, पित्ताशयाच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडाची समस्या उद्भवण्याचा धोका सर्वांधिक असतो. हे आजार टाळण्यासाठी वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

वजन कमी करण्यासाठी आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील अधिक महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात योग्य तो बदल केल्यास भविष्यात हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो.

1. वजन कमी करण्याचे कार्यक्रम राबवल्यास एखाद्या व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला दिला जातो

  • तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमाला चिकटून राहिल्यास आहार आणि व्यायामामध्ये महत्त्वपूर्ण बदल करून वजन राखण्यास मदत होईल.

  • हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी आणि तुमचे आयुष्य वाढवण्यासाठी तुम्हाला आरोग्यदायी सवयींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जाईल.

  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग नियंत्रित रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेमुळे होतो. एथेरोस्क्लेरोसिस नावाच्या रक्तवाहिन्या हळूहळू फुगल्या जातात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होतो.

  • डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर, या सर्व परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे घ्यावी लागतील. इतकंच नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब, रक्तातील साखरेची आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासून घेणं गरजेचं आहे.

  • अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी सर्व महत्वाच्या पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार घ्यावा लागेल. ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, मसूर आणि संपूर्ण धान्य निवडा. जंक, तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेला अन्नापासून दूर रहा.

  • याशिवाय पिझ्झा, पास्ता, मिठाई, चायनीज फूड आणि बेकरीयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान, मद्यपान आणि औषधांचा अवैध वापर कमी करा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे दररोज व्यायाम करा. तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यान करा जे तुम्हाला शांत करतील. निरोगी हृदयासाठी दररोज किमान ८ तासांची चांगली झोप घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT