लाईफस्टाईल

Detox Drink For Weight Loss : सुटलेले पोट येईल नियंत्रणात, वाढलेल्या चरबीपासून होईल सुटका; या डिटॉक्स ड्रिंक्सचे करा नियमित सेवन...

Secret Detox Drink Recipe : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स पेय एक उत्तम पर्याय आहे.

कोमल दामुद्रे

Benefits Of Using Detox water: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स पेय एक उत्तम पर्याय आहे. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजनही आटोक्यात राहते.

डिटॉक्स (Detox) पेय अनेक विशिष्ट प्रकारच्या फळं आणि भाज्यांच्या गुणांपासून संपन्न असते ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे पेय शरीराला (Body) निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर शरीरातील विषारीयुक्त पदार्थांना बाहेर काढण्यास ही मदत करते.

मागील काही वर्षांत डिटॉक्स वॉटर ट्रेंड बनला आहे. उन्हाळ्यात (Summer) शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक नवीन डिटॉक्स पेयाच्या रेसिपीबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचे आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. काकडी, लिंबू, आल्यापासून घरच्या घरी तयार केले जाणारे हे पेय आपल्याला या उन्हाळ्यात एका औषधासारखे काम करेल.

आहारतज्ज्ञ निधी गुप्ता यांनी डिटॉक्स ड्रिंक आपल्या एकूणच आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगितले आहे. दररोज हे पेय प्यायल्यास पचनक्रिया देखील चांगली राहते. या डिटॉक्स पेयाला बनवण्यासाठी पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना, आलं आणि जांभूळ यांसारख्या फळ-भाज्यांचा समावेश असतो. हे डिटॉक्स पेय बनवण्यास अगदी सोपे आहे. याला तयार करुन काही काळासाठी ठेवले जाते. कसे बनवतात हे डिटॉक्स पेय? जाणून घेऊया.

1. डिटॉक्स पेय कसे बनवावे?

1 मध्यम आकाराची काकडी

1 बी नसलेला लिंबू

आल्याचा लहान तुकडा

10 पुदिन्याची पाने

1 लहान चमचा चिया सीड्स

1 लीटर पाणी

बर्फाचे तुकडे

2. डिटॉक्स पेय बनवण्याची कृती

डिटॉक्स पेय बनवण्यासाठी एक लीटर पाण्यात काकडी आणि आल्याला धुवून त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन चिया सीड्स आणि पुदिन्याच्या पानांसोबत रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी या डिटॉक्स पेयात बर्फ घालून प्या.

3. डिटॉक्स पेयाचे फायदेः

  • काकडीचे डिटॉक्स पेय अँटिऑक्सिडंटच्या गुणांनी भरलेलं असते आणि शरीरातील विषारीयुक्त पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते.

  • काकडी हे जीवनसत्त्व आणि खनिजांचे चांगले स्त्रोत आहे. यात 'क' आणि 'के' जीवनसत्त्व असते.

  • लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक स्वरुपात असते टॉक्सिन्सना बाहेर काढण्याचे कार्य करते.

  • काकडीचे डिटॉक्स पेय प्यायल्याने पचनशक्ती सुधारते, रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर हे पाणी त्वचेसाठी देखील उपायकारक असते.

4. डिटॉक्स पेय खरचं प्रभावशाली आहे का?

मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटर येथील एक्यूपेक्चर तज्ज्ञ आणि नैसर्गिक चिकित्सक डॉ. संतोष पांडे यांनी डिटॉक्स वॉटर कोणत्याही प्रकारची अतिरीक्त कॅलरी न वाढवता, पाण्यातील पोषक तत्त्व आणि चव वाढवते असे सांगितले आहे. काकडी, लिंबू, आणि आल्यापासून तयार केलेले हे पेय तहान भागवणारे आणि शरीराला हायड्रेट करणारे आहे. यातील लिंबू शरीरातील टॉक्सिन्सना बाहेर काढण्यास मदत करते. यातील फायबर भूकेला शांत करते. आलं हा एक अॅंटी इंफ्लेमेटरी पदार्थ आहे. दररोज या पेयाचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते आणि वजनही आटोक्यात राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurkuri Bhendi Recipe : लहान मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT