Liver Damage Saam Tv
लाईफस्टाईल

Liver damage: लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये होतात 'हे' मोठे बदल; अधिकतर लोकं समजतात साधारण

Liver damage symptoms in Legs : शरीराची ही सर्व कार्ये योग्यरित्या करण्यासाठी यकृत निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, त्यावर वेळेवर उपचार सुरू करणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव मानला जातो. ज्याच्या मदतीने शरीराची अनेक कार्ये केली जातात. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी यकृत मदत करतं. औषधं आणि इतर रसायनांचं चयापचय या मार्फत होतं. शरीराची ही सर्व कार्ये योग्यरित्या करण्यासाठी यकृत निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, त्यावर वेळेवर उपचार सुरू करणं गरजेचं आहे.

मात्र जर तुमच्या लिव्हरमध्ये काही समस्या असतील तर त्याची लक्षणं शरीराच्या वेगवेगळ्या भागात दिसून येतात. यामध्ये काही लक्षणं ही पायांभोवती दिसून येतात. यासाठीच ही लक्षणं नेमकी कोणती ती जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं.

सतत पायात वेदना - Pain in Your Foot

वारंवार पाय दुखणं हे यकृताच्या आजाराचं एक सामान्य लक्षण मानलं जातं आहे. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा या स्थितीत शरीराच्या खालच्या भागात जास्त द्रव पदार्थ जमा होऊ लागतं. ज्यामुळे पायांवर खूप दबाव येतो.

पायाला सूज येणं - Swelling in your Legs

यकृताच्या समस्येत रुग्णांना त्यांच्या पायांमध्ये तीव्र सूज येऊ लागते. यकृतातील समस्येमुळे शरीरात अतिरिक्त घाण जमा होऊ लागते, ज्याचा परिणाम पायांवरही दिसून येतो. अशा परिस्थितीत पायांभोवती सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला ही समस्या दिसून येत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

पायांना खाज येणं

पायांना खाज येणं हे यकृताच्या आजाराचं लक्षण असू शकते. तुम्हाला या प्रकारची समस्या प्रामुख्याने प्रायमरी बिलीरी सिरोसिस आणि प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलांगायटिस सारख्या आजारांमध्ये होऊ शकते. या परिस्थितींमुळे यकृतातील पित्त नलिकांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि शरीरात जास्त पित्त तयार होतं. यामुळे पायाला तीव्र खाज येऊ शकते.

पाय सुन्न पडणं

यकृताच्या खराब स्थितीमुळे पायांमध्ये मुंग्या येणं आणि सुन्नपणा येण्याची समस्या अधिक जाणवते. ही स्थिती हिपॅटायटीस सी संसर्गामुळे किंवा अल्कोहोलिक यकृतामुळे होऊ शकते. याला पॅरेस्थेसिया असंही म्हणतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT