Hair care, hair falls problem, hair mask, hair care tips, lychee Benefits in Marathi, lychee Benefits for hair fall problem
Hair care, hair falls problem, hair mask, hair care tips, lychee Benefits in Marathi, lychee Benefits for hair fall problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

लिचीचा केसांसाठी असा होईल फायदा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळा हा खरेतर फळांचा हंगाम असतो. या हंगामात आपल्याला टरबूजापासून आंब्यापर्यंत अनेक उत्तम फळांची चव चाखायला मिळते. त्यापैकी एक फळ म्हणजे लिची. (lychee Benefits in Marathi)

हे देखील पहा -

लिची जितकी चविष्ट आहे तितकेच तिचे आरोग्यासाठी (Health) फायदे आहेत. लिचीमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी मुबलक प्रमाणात असते जे केसांना चमक आणण्यास मदत करते. यासोबतच तांबे आणि लोहही पुरेशा प्रमाणात असते, ज्यामुळे आपल्या केसांचा रंग बराच काळ तसाच राहतो. लिची हा तांब्याचा उत्तम स्रोत मानला जातो. लिचीमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आढळतात. यासोबतच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. जर आपल्याला केसांच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर आपण लिचीचा वापर करु शकतो.

असा करा लिचीचा केसांसाठी वापर (Lychee benefits for hair)

१. हवामानातील बदल आणि प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. अशावेळी आपण केसांमध्ये लिचीचा वापर केल्यास केसांची स्थिती चांगली होऊन केसांना चमकही येते.

२. आपले केस सतत गळत असतील किंवा त्यांची वाढ नीट होत नसेल तर आपण लिचीचा वापर करु शकतो. हे केसांच्या कूपांना वाढण्यास मदत करते, ज्यामुळे केसांची वाढ होते.

३. आपले केस जर अधिक पातळ असतील तर आपण केसांची निगा राखण्यासाठी लिचीचा हेअर मास्काचा वापर आपण करु शकतो. लिचीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे केसांच्या वाढीसाठी तर मदत होतेच तसेच केसांची जाडी देखील वाढवते.

४. केसांवर लिची वापरल्यास ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. त्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या मुलायम आणि चमकदार बनतात. अशावेळी केस अधिक कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर आपण लिचीचा नक्कीच फायदा होईल.

५. लिचीचा हेअर मास्क लावल्याने खराब झालेले केस (Hair) दुरुस्त करते व टाळूतील घाण काढून टाकते. लिचीचा हेअर मास्क लावल्यानंतर हलका मसाज केल्यास टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT