Daily योग: जाणून घ्या शशांकासनाचे फायदे Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: जाणून घ्या शशांकासनाचे फायदे

शशांकासन हे आसन अत्यंत फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत आहे. त्यामुळे एकाच जागी बराच वेळ बसून काम केल्यामुळे अनेक जणांमध्ये पाठदुखी, मानदुखी वा कंबरदुखीची समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच या समस्येपासून सुटका करण्यासाठी शशांकासन हे आसन अत्यंत फायदेशीर ठरतं.

हे देखील पहा -

कसं करावं शशांकासन?

प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे जमिनीच्या दिशेने खाली आणण्याचा प्रयत्न करावा. यावेळी शक्य होत असल्यास डोकं जमिनीला टेकवावं आणि हातांचादेखील जमिनीला स्पर्श करावा. यावेळी पाठीला जितका स्ट्रेच देता येईल तितका स्ट्रेच द्यावा. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. ३-४ मिनीटे या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.

शशांकासनाचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.
२. पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत मिळते.
३. पोटाशी निगडीत समस्या दूर होतात.
४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
५. बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.
६. पाठीच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळतो
७. या आसनाने स्मरणशक्ती देखील वाढते

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT