Shri Krishna Janmashtami 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shri Krishna Janmashtami 2023 : जरा मटकी संभाल ब्रिजवाला... भारतात या ठिकाणी दहीहंडीचा सण जल्लोषात केला जातो साजरा, आजच भेट द्या

Shri Krishna Janmashtami : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते.

Shraddha Thik

Krishna Janmashtami 2023 :

दरवर्षी जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. यंदा हा सण 6 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

या दिवशी भाविक नवीन वस्त्रे परिधान करून देवाची विधिवत पूजा (Pooja) करतात. या सणाला लोक आपली घरेही खूप सजवतात. जन्माष्टमीच्या वेळी अनेक ठिकाणी दहीहंडीचा सोहळाही आयोजित केला जातो. लोणी, दही आणि इतर दुधावर आधारित पदार्थ मातीच्या भांड्यात टाकले जातात आणि हे भांडे जमिनीपासून खूप उंचीवर टांगले जाते.

मग लोक त्या भांड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि ते मातीचे भांडे फोडतात. दहीहंडी उत्सवात लोकांची झुंबड उडते. दहीहंडीचा सण भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी निगडीत असल्याचे मानले जाते. यावर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्हालाही दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

बांके बिहारी मंदिर

हे मंदिर (Temple) वृंदावनातील रमण रेतीवर आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. जे भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. जन्माष्टमीच्या विशेष प्रसंगी दहीहंडी उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.

श्री कृष्ण मंदिर

श्रीकृष्ण मंदिर कर्नाटकातील उडुपी येथे आहे. हे मंदिर देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. हे मंदिर 13व्या शतकातील आहे. या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे येथे नऊ छिद्रे असलेल्या खिडकीतून श्रीकृष्णाची पूजा केली जाते. असे मानले जाते की ही नऊ छिद्र खिडकी नऊ ग्रहांशी संबंधित आहे. जन्माष्टमीच्या वेळी येथे दहीहंडीचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो.

गुरुवायूर मंदिर

हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. भगवान श्रीकृष्णामुळे हे स्थान विशेष मानले जाते. हे दक्षिण भारतातील (India) प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही येथे भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT