Kojagiri Purnima 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचं सावट! जुळून येतोय महासंयोग, या राशींची होणार चांदी

Chandra Grahan 2023 Horoscope : २८ ऑक्टोबरला शनिवारी ही पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे

कोमल दामुद्रे

Chandra Grahan 2023 :

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे.

२८ ऑक्टोबरला शनिवारी ही पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री १ वाजून ०६ मिनिटांनी सुरु होईल तर ०२ वाजून २२ मिनिटांनी संपेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चंद्रग्रहणात अनेक शुभ संयोग जुळून येत आहेत. ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण मेष आणि आश्विनी नक्षत्रात आले आहे. बुध हा ग्रह मेष राशीत आल्यामुळे गजकेसरी योग जुळून आला आहे. तसेच रवियोग, शश योग, बुधादित्य (Budhaditya) योग आणि सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. त्यामुळे अनेक राशींना त्याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशी (Zodiac) आहेत.

1. वृषभ

वृषभ राशींच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण फार शुभ ठरणार आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळेल. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनलाभ (Money) होईल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

2. मिथुन

या राशींच्या लोकांना ग्रहणाच्या प्रभावामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आरोग्य चांगले राहिल. वैयक्तिक बाबींमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होईल.

3. सिंह

चंद्रग्रहणामुळे या राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल.

4. कन्या

कन्या राशींसाठी हे चंद्रग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे. शत्रूंवर विजय मिळवाल. ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचे नशिब चमकेल. त्यामुळे धनलाभ होईल. व्यावसाय धंद्यात वाढ होईल.

5. मकर

या लोकांचे मन प्रसन्न राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचे कौतुक होईल. मानसिक तणावातून सुटका होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT