How to reduce Electricity Bill Saam tv
लाईफस्टाईल

Electricity Bill : बिल पाहून घाम फुटतोय? वीजबिल आटोक्यात ठेवण्याच्या 'या' आहेत खास ट्रिक्स

विजेचा योग्यरित्या वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता, त्याचा फरक नक्कीच वीजबिलात दिसून येईल.

Vishal Gangurde

Electricity Bill : वाढत्या वीजबिल दराला तुम्ही वैतागले असाल तर, आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. महागाईमुळे वीज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना ज्यादा वीजबिल भरावे लागत आहे. वीजबिलाचा दर तुमच्या हातात नाही, परंतु विजेचा योग्यरित्या वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता, त्याचा फरक नक्कीच वीजबिलात दिसून येईल. जाणून घ्या वीजबिल कमी करण्याच्या सोप्या ट्रिक्स. (How to reduce Electricity Bill)

तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये बल्ब आणि ट्युबलाइटचा वापर करत असाल, तर त्याच्याजागी LEd लाईटचा वापर करा. LED बल्बचा प्रकाश अधिक पडतो, तसेच त्या बल्बच्या वापरामुळे वीजेची देखील बचत होते. या ट्रिक्समुळे थोडा वीजबिलात दिलासा मिळू शकतो. एसीचा (AC) वापर करताना तापमान तपासून घेतले पाहिजे की, एसीचे तापमान अधिक तर नाही ना? एसीचे तापमान कमी किंवा अधिक असेल तर वीज अधिक वापरली जाते. त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

तुम्ही घरात हीटर , गीझर किंवा रुम हीटरचा वापर करत असाल तर, त्याचेही तापमान कमी ठेवा. वापर झाल्यानंतर तातडीने बंद करायला विसरू नका. कारण या उपकरणाला अधिक वीज लागते. वॉशिंग मशीनमध्ये तिच्या क्षमतेनुसार कपडे धुण्यास टाका. टीव्ही किंवा कॉम्प्युटरचा वापर झाल्यानंतर बंद करावा.

सोलर पॅनलचा वापर करून वीजबिलाची बचत करा

तुम्हाला घरातील वीजबिल (Electricity Bill) आटोक्यात आणायचा असेल तर, सोलर पॅनलचा वापर आवर्जुन केला पाहिजे. सोलर पॅनलचा वापर केला तर वीजबिल अर्ध्यापर्यंत आटोक्यात येते.

'एनर्जी सेविंग डिव्हाईस'चा वापर करा

तुम्ही घरातील लाइट बंद करण्यास विसरत असाल तर, 'एनर्जी सेविंग डिव्हाईस' हे उपकरण तुमच्यासाठी उपयोगाचं ठरू शकतं. या डिव्हाईसमध्ये 230V 24×7 'एनर्जी सेविंग सॉकेट टाइप डिजिटल प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक टायमर' देण्यात आला आहे . हे डिव्हाईस चालू किंवा बंद करण्यासाठी तुम्हाला शेड्युल सेट करण्याची अनुमती देते. याद्वारे तुम्ही तुमचे वीजबिल सहज कमी करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा सुरू

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT