Kitchen tips, Kitchen hacks  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen tips : तव्यावरील गंज दूर करण्यासाठी ही युक्ती ट्राय करा

लोखंडी तव्याची स्वच्छता कशी कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्या बाजारात अनेक प्रकारचे तवे पाहायला मिळतात. लोखंडी तव्यापेक्षा नॉनस्टिकला बाजारात अधिक मागणी आहे. परंतु, काही घरात आई-आजीची आठवण म्हणून आपल्याला लोखंडी तवा पाहायला मिळतो.

हे देखील पहा -

आपल्या घरात लोखंडी तव्याचा वापर हा भाकरी किंवा पुरणपोळी बनवण्याकरिता होतो. काही स्त्रिया तर चपाती बनवण्यासाठी देखील या तव्याचा वापर करतात. परंतु, आपण या तव्याला निरखून पाहिले तर आपल्याला कळेल की, त्याला अनेक डाग किंवा रेषा पडलेल्या दिसतील. चपाती किंवा पराठे बनवल्यानंतर यावर अनेक प्रकारचे थर जमा होतात. या थरावर पाण्याचा ओलावा निर्माण झाल्यास तवा गंजायला वेळ लागत नाही. अनेक वेळा तवा सहज साफ (Clean) होतो परंतु, त्याचा गंज निघत नाही. लोखंडी तवा कसा स्वच्छ करायचा व त्याची चमक कशी टिकवून ठेवायची हे जाणून घेऊया.

१. आपल्या तव्यावर अन्नपदार्थ चिकटले असतील तर त्याला टिश्यू पेपरने आधी साफ करा. तव्यावर मीठ घालून पसरवून घ्या. १० मिनिटानंतर त्यावर लिंबू घासून साफ करा. त्यावर गरम पाणी घालून स्वच्छ धुवा.

२. एका भांड्यात बेकिंग सोडा व गरम पाणीचे मिश्रण तयार करा. तयार मिश्रण हे तव्यावर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. त्यावर लिंबू घासून गरम पाण्याने स्वच्छ धुवा. तवा आधीसारखा चमकण्यास मदत होईल.

३. तव्याला धूण्यापूर्वी त्याच्यावर लिंबू घासून घ्या. त्यानंतर भांडे घासण्याच्या डिशवॉश किंवा स्क्रबने साफ करा. यामुळे तव्यावर असणारा चिकटपणा, काळेपणा व जंग निघण्यास मदत होईल.

लोखंडाच्या तव्याची काळजी कशी घ्याल

१. आपण एकाच तव्यावर डोसा, चपाती किंवा भाजी बनवत असू तर तवा खराब होण्याची शक्यता अधिक असते.

२. धुतल्यानंतर तव्यावर पाणी (Water) जास्त वेळ पर्यंत राहू देऊ नका. त्यासाठी तव्याला स्वच्छ पुसून घ्या.

३. तव्याला सतत गंज लागत असेल तर त्यावर तेलाचे काही थेंब घालून पुसून घ्या.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जो महापौरपद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, 'या' महापालिकेत भाजप-ठाकरेसेनेची युती होण्याची शक्यता

Kolhapur Mayor Race: कोल्हापुरात महापौरपदाची ‘खांडोळी’ की स्थैर्य? महायुतीतच महापौर पदावरून रस्सीखेच

अजित पवारांसह विमानात ५ जण होते की ६ जण..? शंकांचं काहूर सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Maharashtra Live News Update: अलिबागच्या आंबेपूर मतदार संघात शिवसेनेचे बॅनर फाडले

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला मिळणार भरपगारी सुट्टी, कोणकोणत्या जिल्हा अन् शहरातील कामगारांना होणार फायदा?

SCROLL FOR NEXT