simple kitchen hacks to stop halved lemons from drying out  saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Tips : कापलेला लिंबू वाळू नये म्हणून वापरा या सोप्या ट्रिक्स; रसही राहील अनेक दिवस ताजा

lemon preservation : स्वयंपाकात थोडासा वापरल्यानंतर उरलेला अर्धा लिंबू काही तासांतच सुकतो आणि कडक होतो. पण काही सोप्या ट्रिक्स वापरल्यास कापलेला लिंबू अनेक दिवस अगदी रसरशीत आणि ताजा ठेवू शकता.

Saam Tv

लिंबाचा वापर जेवणाची चव वाढवण्यापासून ते सरबत आणि विविध पदार्थ बनवण्यापर्यंत केला जातो. मात्र, अनेकदा एकाच वेळी संपूर्ण लिंबाचा वापर होत नाही. अर्धे लिंबू उरल्यास ते काही वेळातच वाळू लागते. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही त्यातील रस आणि ताजेपणा कमी होतो. अशा वेळी लिंबू योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास ते अधिक काळ ताजे ठेवता येऊ शकते.

संपूर्ण लिंबू असे ठेवा ताजे

बाजारातून एकाच वेळी जास्त लिंबू आणले असल्यास ते खोलीच्या तापमानावर ठेवता येतात. मात्र, जास्त दिवस टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवणे अधिक चांगले. लिंबू थेट फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी हवाबंद डब्यात ठेवल्यास त्यातील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. हिरव्या रंगाचे कच्चे लिंबू काही काळ बाहेर ठेवता येतात. पिवळे झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवावेत.

अर्धे कापलेले लिंबू कसे साठवावे?

लिंबाचा अर्धा भाग वापरल्यानंतर उरलेला भाग उघडा ठेवू नये. त्यामुळे तो लवकर वाळतो. लिंबाचा कापलेला भाग प्लास्टिक रॅपने व्यवस्थित झाकून फ्रिजमध्ये ठेवावा. तसेच हवाबंद डब्यात ठेवण्याचाही पर्याय आहे. असे लिंबू शक्यतो काही दिवसांत वापरावे.

लिंबाचा रस साठवण्याची सोपी पद्धत

लिंबाचा रस काढून स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवता येतो. जास्त काळ साठवायचा असल्यास आइस क्यूब ट्रेमध्ये रस भरून फ्रीजरमध्ये ठेवावा. रसाचे बर्फाचे तुकडे तयार झाल्यानंतर ते डब्यात भरून ठेवता येतात. गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो.

लिंबाची सालही उपयोगी

  • लिंबाच्या सालीचा वरचा पिवळा भाग किसून तयार होणारा झेस्ट केक, बेकिंग आणि इतर पदार्थांमध्ये वापरता येतो. तो हवाबंद डब्यात भरून फ्रीजरमध्ये साठवता येतो.

  • या सोप्या पद्धतींचा वापर केल्यास लिंबाचा अपव्यय टाळता येतो आणि त्याचा ताजेपणा अधिक काळ टिकवण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये भरदिवसा थरार! घरातून उचलून आणत कारमध्ये कोंबलं; दिवसाढवळ्या ३५ वर्षीय महिलेचं अपहरण

Maharashtra News Live Update: धुळे एसटी परिवहन विभागाच्या महसुलामध्ये यंदाची दिवाळीत भरगोच वाढ

No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

Health Tips : ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढला; चुकीची जीवनशैली आणि आहार ठरतोय कारणीभूत

SCROLL FOR NEXT