आपल्या घरातील किचन हा साफ असलाच पाहिजे. घरातील किचन जर साफ नसेल तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याचं कारण म्हणजे ही आपल्या घरातील ती जागा असते ज्या ठिकाणी घरातील जेवण बनतं. किचनमधील भांडी साफ करण्यासाठी आपण स्पंजच्या स्क्रबचा वापर करतो. या स्क्रबच्या सहाय्याने खराब भांडी आपण धुतो.
मात्र तुम्हाला माहितीये का की, तुमच्या घरातील खराब भांडी साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा हा स्क्रब तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय. भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हा स्क्रब आणि स्पंजमुळे तुमची किडनी देखील खराब होऊ शकते.
अनेकदा भांडी घासल्यानंतर आपण स्क्रब किंवा स्पंज ओला ठेवतो. बराच काळ हा स्क्रब ओला राहिल्याने यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. यामध्ये ई-कोलाय, फेकल बॅक्टेरिया, साल्मोनेला यांसारखे धोकादायक बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो.
त्यामुळे जेव्हा आपण या स्पंजने किंवा स्क्रबने भांडी घासतो त्यावेळी ते बॅक्टेरिया तुमच्या भांड्यांना चिकटतात. या भांड्यामध्ये खाणं बनवल्याने ते बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात. शरीराच्या आता गेल्यावर या बॅक्टेरियामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.
स्क्रबद्वारे तुमच्या पोटात पोहोचणारे बॅक्टेरिया तुमचं आरोग्य बिघडू शकतात. यामुळे तुमच्या आतड्यांचं खूप नुकसान होऊ शकतं. या जीवाणूंमुळे अन्न विषबाधा, क्रॉस-कॉन्टेमिनेशन होणं आणि गॅस्ट्रो आतड्यांसंबंधी संसर्ग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या जीवाणूंमुळे मेंदुज्वर, न्यूमोनिया आणि किडनी निकामी होण्याचा धोका देखील होऊ शकतो.
ड्यूक युनिव्हर्सिटीतील बायोमेडिकल इंजिनीअर्सनी केलेल्या अभ्यासात असं म्हटलं गेलंय की, स्क्रबमध्ये वाढणारा अँपिलोबॅक्टर नावाचा जीवाणू आतड्यांना गंभीरपणे नुकसान करू शकतो. यामुळे किडनी निकामी होण्याचा धोकाही वाढतो. त्याच वेळी, या स्क्रबमध्ये वाढणाऱ्या ई. कोलाय बॅक्टेरियामुळे हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.