Kidney Damage Symptoms on face saam tv
लाईफस्टाईल

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरील 'हे' बदल ओळखा; किडनी खराब असल्याची लक्षणं असू शकतात

Kidney Damage Symptoms on face : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. यामध्ये किडनीचा देखील समावेश आहे. ज्यावेळी किडनीच्या कार्यात कोणताही बिघाड होतो तेव्हा शरीर तुम्हाला काहीतरी संकेत देत असतं.

Surabhi Jayashree Jagdish

Kidney Damage Symptoms on face : सकाळी उठून फ्रेश झाल्यावर अनेकदा आपण आरशात आपला चेहरा पाहतो. मात्र बऱ्याचदा चेहरा सुजलेला वाटतो. जर तुमचा चेहरा सुजलेला वाटत असेल किंवा तोंडात एक विचित्र चव येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कधीकधी ही समस्या सामान्य असू शकते. परंतु जर ही समस्या वारंवार होत राहिली तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही किडनीच्या फेल्युअरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

किडनीचे मुख्य काम शरीरातील कचरा आणि जास्तीचं पाणी काढून टाकणं हे असतं. मात्र ज्यावेळी जेव्हा किडनी योग्यरित्या काम करत नाही तेव्हा हा कचरा शरीरात जमा होऊ लागतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येणं, वेगळी चव आणि थकवा यासारख्या समस्या वाढू लागतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला अशी लक्षणं दिसली तर सावध रहा.

चेहऱ्यावर सूज येणं

किडनीचं काम शरीरातील कचरा आणि अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचं असून ज्यावेळी ते योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा शरीरात पाणी साचू लागतं. ज्याचा परिणाम सकाळी उठताच डोळे आणि चेहऱ्यावर सूज येण्याच्या स्वरूपात दिसून येतो.

थकवा

कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल शिवाय पायांमध्ये क्रॅम्प्स येण्याची समस्या असेल तर समजून घ्या की तुमचे किडनीच्या कार्यामध्ये समस्या आहेत. जर ही सर्व लक्षणं एकत्र दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चव वेगळी लागणं

जेव्हा किडनी शरीरातील नकोसे घटक फिल्टर करू शकत नाही तेव्हा रक्तात विषारी पदार्थ वाढू लागतात. याचा थेट परिणाम तोंडाच्या चवीवर आणि श्वासावर होत असतो. सकाळी तोंडात कडूपणा आणि तोंडाची दुर्गंधी येणं ही खूप सामान्य लक्षणं असू शकतात.

किडनीचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावं?

  • भरपूर पाणी प्या, मात्र मर्यादा लक्षात ठेवा

  • मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खावेत

  • रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा.

  • सहा महिन्यांतून एकदा तुमच्या किडनीची तपासणी करा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्यादिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? १ तोळा सोन्याचे इतके आहेत दर; वाचा 24K,22K,18Kचे ताजे दर

BJP News: मोठी बातमी! भाजपकडून युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर, महाराष्ट्रातील ३ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

SCROLL FOR NEXT