Ketu Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ketu Gochar 2023 : केतूची वक्रीचाल या राशींना देईल धनलाभ; अपूर्ण इच्छा होतील पूर्ण, नोकरी व्यवसायात मिळेल यश

Ketu In Kundali : केतू या ग्रहामुळे काही राशींना शुभ तर काहींना अशुभ फले मिळतील.

कोमल दामुद्रे

Ketu Rashi Parivartan : ज्योतिष्यशास्त्रात केतूला अशुभ ग्रह मानले जाते. याची चाल नेहमी उलटसुलट असल्यामुळे अनेकांच्या राशीत बदल होतात. केतू या ग्रहामुळे काही राशींना शुभ तर काहींना अशुभ फले मिळतील.

सध्या केतू हा तूळ राशीत असून ऑक्टोबरमध्ये कन्या राशीत (Zodiac) जाईल. कर्म ग्रह मानला जाणारा केतू चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांचे फले देतो. केतूच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल. पण 3 राशी आहेत, ज्यासाठी व्यवसाय-करिअर (Career) आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. वृषभ

केतूच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर यश मिळेल. या राशींच्या कुंडलीतील पाचव्या भावात केतू विराजमान आहे. त्यामुळे अचानक आर्थिक (Money) लाभ होण्याची शक्यता होईल. तसेच आरोग्य निरोगी राहील आणि मानसिक तणावही दूर होईल. प्रेम जीवनात तुम्हाला चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. पैसे मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आर्थिक बाजू मजबूत होईल.

2. सिंह

केतूचे संक्रमण सिंह राशीसाठी देखील खूप भाग्यवान असेल. कुंडलीच्या दुसऱ्या घरात केतूचे संक्रमण होत आहे. अडकलेले पैसे मिळतील.या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील आणि संबंध सुधारतील. समाजात मानसन्मान वाढेल. बोलण्याने लोकांना प्रभावित कराल. धनप्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील.

3. धनु

धनु राशीच्या लोकांसाठी कन्या राशीतील केतूचे संक्रमण फलदायी ठरू शकते. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही नवीन उंची गाठू शकता. नोकरदार लोकांना नवीन संधी मिळू शकते. याशिवाय व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बढती मिळेल. पैशाची कमतरता भासणार नाही. वडिलांचे सहकार्य मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT