PowerBank Purchasing Tips Saam Tv
लाईफस्टाईल

PowerBank For Mobile : पॉवर बँक खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

PowerBank : बाहेर आपल्या मोबाईलची बॅटरी संपली की आपण पॉवर बँकचा वापर करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PowerBank Uses and Quality

सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढत आहे. स्मार्टफोन हा गरज बनली आहे. रोजच्या कामांसाठी स्मार्टफोन आवश्यक असतात. त्यामुळे कुठेही जाताना आपण स्मार्टफोन घेऊन जातो. परंतु कधी कधी फोनची चार्जिंग संपते आणि फोन बंद होतो. पर्यायी संपर्कासाठी साधन नसते. त्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

बाहेर आपल्या मोबाईलची बॅटरी संपली की आपण पॉवर बँकचा वापर करतो. पावर बँक आपण कुठेही, कधीही घेऊन जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पॉवर बँक आपली मदत करते. परंतु हीच पॉवर बँक खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरुन तुम्हाला काही त्रास होणार नाही.

1. पॉवर बँकची क्षमता

पॉवर बँक खरेदी करताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पॉवर बँकची बॅटरी ही तुमच्या मोबाईलच्या बॅटरीपेक्षा अडीच पट जास्त असेल. जेणेकरुन आपल्याला पॉवर बँक तुलनेने दोन वेळा जास्त वापर करता येईल. बॅटरीची क्षमता लक्षात ठेवूनच पॉवर बँक खरेदी करा.

2. चार्जिंग

पॉवर बँक खरेदी करताना चार्जिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉवर बँक खरेदी करताना त्याच्या चार्जिंग पॉइंटकडे लक्ष द्या. बाजारात अशा अनेक पॉवर बँक आहेत ज्या फक्त USB केबलनशी कनेक्ट होतात. त्यामुळे तुम्ही पॉवर बँक खरेदी करताना चार्जिंगमध्ये काही अडचणी येऊ नये याची काळजी घ्या.

3. किती डिव्हाईस होणार चार्ज

तुम्ही पॉवर बँक खरेदी करत असाल तर एकावेळी किती डिव्हाईस चार्ज करु शकता याकडे लक्ष द्या. एकावेळी कमीत कमीत दोन डिव्हाईस चार्ज करता येतील अशी पॉवर बँक विकत घ्या.

4. व्होल्टेज

पॉवर बँकमध्ये पॉवर व्हॉल्टेज हे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही खरेदी केलेल्या पॉवर बँकचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या मोबाईलसोबत मॅच होत नसेल तर तुमचा फोन चार्ज होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलला सपोर्ट करणाऱ्या व्हॉल्टेजची पॉवर बँक खरेदी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT