Rose Day: कहाणी 112 कोटींच्या गुलाबाची; फुल फुलवण्यासाठी लागतात 15 वर्ष David Austin
लाईफस्टाईल

Rose Day: कहाणी 112 कोटींच्या गुलाबाची; फुल फुलवण्यासाठी लागतात 15 वर्ष

फायनान्स ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, एका ज्युलिएट रोज ची किंमत अंदाजे 112 कोटी रुपये आहे.

वृत्तसंस्था

आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. त्यातलाच आज रोज डे (Rose Day) आहे. व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) हा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या एक आठवडा आधी सुरू होतो. आणि व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या आठवड्याच्या पहिल्या दिवसाला रोज डे असे नाव देण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात गुलाबाच्या फुलांनी होते. जगभर गुलाबांचे हजारो प्रकार आहेत, पण एक गुलाब असा आहे जो आपल्या सौंदर्यामुळे आणि खास सुगंधामुळे जगभर प्रसिद्ध आहे. हा इतका खास आहे की जगातील सर्वात महाग गुलाबांमध्ये त्याची गणना होते.

Juliet Rose

फायनान्स ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, एका ज्युलिएट रोजची किंमत अंदाजे 112 कोटी रुपये आहे. ते महाग देखील आहे कारण त्याची लागवड करणे खूप कठीण काम आहे. ज्युलिएट रोजची पहिली ओळख 2006 मध्ये झाली होती. गुलाबावरती विशेष प्रयोग आणि त्याची शेती करणाऱ्या डेविड ऑस्टिन यांनी त्याला खास उगवले होते. टाईम्सनाऊच्या रिपोर्टनुसार, डेव्हिडने अनेक प्रकारचे गुलाब एकत्र करून नवीन प्रकारचे फूल बनवले होते. आणि त्यालाच ज्युलिएट रोज असे नाव देण्यात आले.

ज्युलिएट रोज इतक्या सहजासहजी उगवत नाही. पोलन नेशनच्या अहवालात म्हटले आहे की, ज्युलिएट रोज फुलण्यासाठी सुमारे 15 वर्षे लागतात. या विशेष प्रकारच्या गुलाबाला एफ्रिकोट-ह्युड असे संकरित नाव देण्यात आले आहे. डेव्हिडने 2006 मध्ये सादर केलेल्या पहिल्या ज्युलिएट रोजची किंमत 90 कोटी रुपये होती.

Juliet Rose

त्याचा सुगंध फार खास आहे. डेव्हिड ऑस्टिनच्या अधिकृत वेबसाइटवर या गुलाबाच्या सुगंधाचा उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, त्याचा सुगंध सौम्य आहे जो परफ्यूमसारखा वाटतो. जे बहुतेक लोकांना आवडले आहे. त्याच्या सर्व गुणांमध्ये सुगंधाची देखील महत्त्वाची भूमिका आहे, ज्यामुळे ते वेगळे बनते. गुलाब हा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे आणि आकारामुळे लोकांना नेहमीच आवडतो. मुघल काळापासून आजपर्यंत गुलाबाकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. तथापि, त्यात असे अनेक गुणधर्म देखील आहेत. ज्यामुळे ते सौंदर्य प्रसाधनापासून औषधांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये वापरले जाते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT