Jio VS Airtel Recharge
Jio VS Airtel Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio VS Airtel Recharge : जिओ की, एयरटेल? १९९ रुपयांच्या किमतीत अनलिमिटेड कॉल्स आणि जबरदस्त डेटाची ऑफर कशावर मिळेल?

कोमल दामुद्रे

Jio Vs Airtel Recharge Plan :

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ आणि एअरटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन प्लान आणत असतात. सध्या दोन्ही कंपन्यांचे नाव चर्चेत आहे. या दोन्ही कंपनी देशातील सगळ्यात मोठी कंपनी असून ती प्रत्येक महिन्यात ग्राहकांना नवीन रिचार्ज ऑफर करत असते.

अशातच जिओ (Jio) आणि एयरटेल (Airtel) १९९ रुपयांचा रिचार्ज आणला आहे. हा प्रीपेड प्लान असून सगळ्यात चांगली ऑफर्स कोणती कंपनी देते याविषयी आपण जाणून घेऊया. तसेच अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि रिचार्ज प्लानची वैधता किती दिवसांची आहे हे पाहूया.

1. रिलायन्स जिओचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या (Price) रिचार्ज प्लानची वैधता २३ दिवसांची आहे. यात जिओ वापरकर्त्यांना दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच ३४.५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये वापरकर्त्यांना दिवसाला १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते आहे. तसेच यामध्ये युजर्सला सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा देखील मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security सारख्या Jio अॅप्सचे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.

2. एयरटेल १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एयरटेल १९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील युजर्सना देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री एसएमसची सुविधाही मिळणार आहे. याआधी एयरटेलचा ९९ रुपयांचा प्लान होतो जो बंद केला त्यानंतर आता सर्वात स्वस्त प्लान हा १५५ रुपयांचा आहे. एयरटेलचा हा बेसिक एंट्री लेव्हल प्लान आहे. पण ग्राहकांना एयरटेलचा १९९ रुपयांचा प्लान फायदेशीर पडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Breaking News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी

Parliament Session: संसदेत पुन्हा घमासान! PM मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार; राहुल गांधींच्या आरोपांवर काय बोलणार?

Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेचा या महिलांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Weather Forecast : मुंबईसह राज्यातील 'या' भागात आजपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस

Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना मिळणार कष्टाचं फळ

SCROLL FOR NEXT