Jio Independence Day Offer 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Independence Day Offer 2023 : 15 ऑगस्टनिमित्त जिओची बंपर ऑफर! एकदा रिचार्ज करा वर्षभर Validity मिळवा

Jio Recharge Yearly Plan Offer: रिचार्जसोबत जिओ इतर अनेक गोष्टींवर ऑफर देत आहे.

कोमल दामुद्रे

Jio's Special Recharge Plan on 15 August 2023:

रिलायन्स जिओने भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काहींना काही खास प्लान ऑफर करत असते. अशातच युजर्सना स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफरमध्ये डेटा व कॉलिंगवर विशेष सूट मिळणार आहे. याशिवाय फूड डिलिव्हरी, ट्रॅव्हल, ऑनलाइन शॉपिंग यावर मोठी सूट मिळणार आहे.

रिलायन्स जिओने इंडिपेडन्स डे २०२३ ऑफरच्या नावाने येणाऱ्या या प्रमोशनचा लाभ प्रीपेड वापरकर्त्यांना मिळेल. प्रीपेड वापरकर्ते ज्यांनी 2,999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लान घेतला आहे त्यांना 2.5GB दिवसाला, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. 365 दिवसांची वैधता मिळण्यासोबत, JioCinema, JioTV आणि JioCloud वर प्रवेश देखील उपलब्ध आहे. हा प्लान 5G डेटा वापरासाठी देखील आहे.

1. फायदे कोणते?

या नवीन ऑफरमध्ये (Offer) वापरकर्त्यांना आता Swiggy वर 249 रुपयांपेक्षा (Money) अधिकच्या ऑर्डरवर 100 रुपयांची सूट मिळेल. यात्रा प्लॅटफॉर्मवरून फ्लाइट बुक करून 1500 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. यात्रेपासून देशांतर्गत हॉटेल बुकिंगवर (Booking) वापरकर्त्यांना 15% (रु. 4,000 पर्यंत) सवलत मिळेल.

यासह, Ajio ऑर्डरवर 200 रुपयांची किंमत देखील कमी केली जाईल. Netmeds कडून रु.999 पेक्षा जास्त ऑर्डरवर 20% सूट मिळेल. तसेच रिलायन्स डिजिटलकडून गॅझेट किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर 10 टक्के सूट देखील मिळेल. तसेच हा रिचार्ज २९९९ रुपयांच्या प्लान तुम्हाला MyJio अॅपवरुन करता येईल

2. 5G स्मार्टफोन लवकरच लॉन्च

याशिवाय जिओ लवकरच भारतात आपला 5G स्मार्टफोन आणणार आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 480+ चिपसेट, 4GB रॅम, Android 12 सह येईल. कॅमेऱ्याच्या बाबतीत, यात 13MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP दुय्यम सेन्सर दिला जाऊ शकतो. फ्रंट कॅमेरा 5MP चा असू शकतो. यासोबतच Jio च्या आगामी शोमध्ये Air Fiber 5G देखील सादर केला जाऊ शकतो. हे एक हॉटस्पॉट उपकरण आहे जे 5G तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी तयार केले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT