Jio Phoes yandex
लाईफस्टाईल

Jio Phones Amazon Offer: जिओ फोन्स झाले स्वस्त; २५२ अन् ११७ रुपये भरा आणि घरी न्या मोबाईल फोन्स

Bharat Jadhav

Jio Phones Amazon Offer:

जिओ देशाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना फक्त सिम नाही तर फीचर फोन आणि स्मार्टफोन देखील उपलब्ध करून देते. नवीन वर्ष सुरू होण्याआधी कंपनीने एक धमाकेदार ऑफर सुरू केलीय. ग्राहक जिओ फोन्स कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहेत. जर कोणी स्वस्त आणि दमदार फीचर असलेला अँड्राइड स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असेल त्यांच्यासाठी आज सर्वात भारी संधी आहे.(Latest News)

ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर सध्या जिओ फिचर फोन आणि स्मार्टफोनवर कमालीची सूट दिली जात आहे. JioBharat B1 4G फोन तुम्ही त्याच्या एमआरपी किमतीच्या अर्ध्या किमतीवर खरेदी करू शकणार आहात. अ‍ॅमेझॉनच्या या सेल ऑफरमध्ये तुम्ही जिओचे सध्याचे स्मार्टफोन Jio Phone Prima 4G वर सूट मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अ‍ॅमेझॉनवर चालू असलेल्या ऑफरमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर JioFi Jio Phone Next 32GB या प्रकारच्या फोनला तुम्ही बँक ऑफर किंवा एक्सचेंज ऑफर खरेदी करू शकता. तेही कमी किमतीमध्ये. जिओ फोन्सवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी आपण सर्वकाही माहिती जाणून घेऊ.

JioBharat B1 4G वरील ऑफर

JioBharat B1 4G ची खरी किमत २५९९ रुपये आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये तुम्ही ५० टक्के डिस्काउंटसह १२९९ रुपयात फोन खरेदी करू शकणार आहात. जर तुम्हाला इतके पैसा देऊ वाटत नाही तर तुम्ही हा फोन ईएमआयवर खरेदी करू शकतात. या फोनसाठी फक्त १८८ रुपयांचा ईएमआय तुम्हाला भरावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे कंपनी तुम्हाला त्यावर अजून ३०० रुपयांची बँक डिस्काउंट देणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला गाणे ऐकण्यासाठी जिओ सावन आणि पेमेंट करण्यासाठी युपीआयची सुविधा देण्यात आलीय.

Jio Phone Prima 4G वरील ऑफर

जिओ कंपनीचा हा फिचर फोन आहे. या फोनमध्ये जिओ भारत फोन पेक्षा सरस फिचर्स मिळतात. या फोनची मूळ किमत ३ हजार ९९९ फोन आहे. अ‍ॅमेझॉन या फोनवर थेट ३५ टक्के डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमुळे ग्राहकांना हा फोन फक्त आणि फक्त २५९९ रुपयामध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला हा फोन ईएमआयवर घ्यायचा असेल तर तेही सुविधा कंपनी दिलीय. ग्राहकांना हा फोन घेण्यासाठी फक्त ११७.०१ रुपयांचा ईएमाय भरावा लागणार आहे.

Jio Phone Next वरील ऑफर

जर तुम्हाला स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अ‍ॅमेझॉनवरील ही ऑफर उत्तम आहे. जिओच्या जिओ फोन नेक्स्टवर मोठी ऑफ दिली जात आहे. जिओ फोन नेक्स्टचा फोन तुम्ही २९ टक्क्यांच्या सूटवर खरेदी करू शकतात. या फोनची मूळ किमत ५,१९९ रुपये आहे. परंतु डिस्काउंटवर हा फोन तुम्ही फक्त ४९०० रुपयात खरेदी करू शकतात. जर हा फोन ईएमआयवर खरेदी करायचा असेल तर फक्त २५२ रुपयांचे ईएमआय भरावे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT