Recharge Plans  Saam Tv
लाईफस्टाईल

Recharge Plans : Jioने आणला पैसा वसूल प्लान !कमी किमतीत 84 दिवसांसाठी Unlimited कॉलिंगसह इंटरनेट फ्री

Plans For Recharge : जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Reliance Jio Recharge : जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची ​​मासिक किंमत फक्त 240 रुपये आहे जी अतिशय सोयीस्कर आहे. या रिचार्ज प्लानमध्ये जिओ यूजर्स अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील.

या प्लानची ​​किंमत 719 रुपये आहे, ज्यामध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लानचा वापर करून जिओ ग्राहक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल...

Jio Rs 719 प्लान -

या प्लानमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते म्हणजेच एकूण 168 GB दिले जाते. वापरकर्ते अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची (Calling) सुविधा देखील दिली जाईल जी 84 दिवसांसाठी वैध असेल.

यासोबतच यूजर्सना दररोज 100 एसएमएस वापरण्याची सुविधाही दिली जाणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ (Jio) सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जाईल. या प्लानची ​​मासिक किंमत 240 रुपये असेल.

जिओच्या 299 रुपयांच्या प्लान -

28 दिवसांच्या वैधतेसह 299 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 56 जीबी डेटा दिला जातो, त्यापैकी 2 जीबी डेटा दररोज दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे आणि यासोबतच दररोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे. या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

जर तुम्ही नवीन प्लान शोधत असाल, तर 719 रुपयांचा प्लान फायदेशीर (Benefits) वाटतो, कारण 719 रुपयांच्या प्लानची ​​मासिक किंमत 240 रुपये आहे आणि तत्सम सुविधाही उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT