Janaki Jayanti 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Janaki Jayanti 2024 : आज सीता अष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

Sita Ashtami 2024 Date : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला सीता अष्टमी साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Sita Ashtami 2024 :

हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. पंचागानुसार आज अष्टमी तिथी आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला सीता अष्टमी साजरी केली जाते.

यंदा सीता अष्टमी ४ मार्चला साजरी (Celebrate) करण्यात येईल. या दिवशी देवी सीता आणि प्रभू श्रीरामचंद्राची विधीवत पूजा केल्याने भक्तांचे संकट दूर होतात. जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत.

1. सीता अष्टमीचे महत्त्व

हिंदू धर्मात देवी सीतेला लक्ष्मीचे रुप मानले आहे. शास्त्रानुसार या दिवशी मनोभावे पूजा आणि उपवास केल्याने आपल्या इच्छित फळ मिळते. यामुळे पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते. हे व्रत संतान प्राप्तीसाठी देखील महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की, विवाहित जोडप्यांनी (Couples) या दिवशी उपवास केल्याने संततीचे सुख प्राप्त होते.

2. सीता अष्टमीचा शुभ मुहूर्त

३ ​​मार्च रोजी सकाळी ०८:४४ पासून, माघ कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ४ मार्च रोजी सकाळी ०८:४९ पर्यंत असेल. या दिवशी देवी सीतेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी ०९.३८ ते ११.०५ पर्यंत असेल.

3. पूजा विधी

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे घाला.

  • सीता मातेला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा करा.

  • मंदिरासमोरील चौकटीवर लाल रंगाचे कपडे लावून सीता आणि प्रभू रामाची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा.

  • यानंतर फोटोला अक्षता आणि पांढरी फुले समर्पित करा. आपल्या श्रद्धेनुसार दान करा.

  • तसेच पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT