Indian Railway Rule Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Railway Rule : रेल्वेचा नवा नियम ! ट्रेन चुकली तरी प्रवास होणार अधिक सुखकर, कसा ते जाणून घ्या सविस्तर

Ticket Rules : बरेचदा काही कारणांमुळे आपली ट्रेन चुकते. अशावेळी रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा ऑफर करते.

कोमल दामुद्रे

Indian Railway Break Journey Ticket Rules : आपल्यापैकी अनेकांना ट्रेनचा प्रवास आवडत नाही आणि आवडत असला तरी तो अधिक सुखकर किंवा मजेशीर हवा असतो. भारतीय रेल्वे ही लांबच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सोयीस्कर समजली जाते.

कोणत्याही वाहनांपेक्षा हा प्रवास (Travel) अधिक आरामदायी वाटतो. प्रवाशांना लक्षात घेऊन रेल्वेने हे नियम केले आहेत. यापैकी काही नियमांबद्दल (rules) अनेकांना माहीतच नसेल. बरेचदा काही कारणांमुळे आपली ट्रेन (Train) चुकते. अशावेळी रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा ऑफर करते.

रेल्वे तुम्हाला अशी सुविधा देते की तुम्ही पुढील 2 थांब्यांवर जाऊन तुमची ट्रेन पकडू शकता. यानंतर तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा प्रवास थांबत थांबत देखील करु शकता कसे ते जाणून घेऊया

अनेक वेळा आपण फिरण्यासाठी व लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेनची बुकिंग आधीपासून करतो. त्यासाठी आपण तिकीट देखील आधीच बुक करुन ठेवतो. परंतु, नंतर प्लान बदलतो, अशावेळी तुम्हाला नवीन तिकीट घेण्याची गरज नसते. त्याच तिकिटावर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवू शकता. मात्र, या काळात तुम्हाला तुमच्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलावा लागू शकतो.

1. पुढचा प्रवास कसा असेल

तुमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला TT म्हणजेच तिकीट कलेक्टरशी बोलावे लागेल. तो पुढचे तिकीट तयार करून तुम्हाला देईल. तुमची ट्रेन काही कारणास्तव चुकली, तर तुम्ही ती पुढे २ स्टेशनपर्यंत ती पुन्हा पकडू शकता, तोपर्यंत टीटी तुमची सीट कोणाला देणार नाही.

2. रूट ब्रेक जर्नी नियम काय आहे?

या रेल्वेच्या नियमाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्ही 500 किमी पेक्षा जास्त लांबच्या प्रवासावर असाल तर तुम्ही मध्ये ब्रेक घेऊ शकता. जर प्रवास 1000 किलोमीटरचा असेल तर तुम्ही त्यात दोन ब्रेक घेऊ शकता. तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा, तुमच्या येण्याची व जाण्याची तारीख सोडून 2 दिवसांचा ब्रेक घेऊ शकता. मात्र, हा नियम देशातील शताब्दी, जनशताब्दी आणि राजधानीसारख्या लक्झरी ट्रेनला लागू होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT