iPhone 14 Offer Social media
लाईफस्टाईल

iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी iPhone 14 झाला स्वस्त, 35 हजारांपेक्षा कमी किमतीत करा खरेदी

iPhone 14: इतक्या स्वस्त किमतीत तुम्ही आयफोन 14 कुठे आणि कसा खरेदी करु शकता हे घ्या जाणून...

Priya More

iPhone 14 Price Cut: आयफोन (iPhone) खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण किंमत जास्त असल्यामुळे अनेकांच्या खिशाला आयफोन खरेदी करणं परवडत नाही. पण आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे आणि अतिशय स्वस्तात तुम्ही आयफोन खरेदी करु शकणार आहोत. ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आयफोन 15 ची सीरिज (iPhone 15 Series) लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासाठी युजर्स खूपच उत्सुक आहेत.

अशामध्ये आयफोन 15 लॉन्च होण्यापूर्वीच आयफोन 14 च्या किमती (iPhone 14 Price) घसरल्या आहेत. जवळपास 80 हजारांचा आयफोन 14 तुम्ही फकेत 35 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकणार आहात. इतक्या स्वस्त किमतीत तुम्ही आयफोन 14 कुठे आणि कसा खरेदी करु शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत...

स्वस्तात करा खरेदी -

आयफोन 14 ची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये आहे. परंतु तो फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हे फ्लिपकार्टवर 11% च्या सूटसह 70,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच, या आयफोनवर संपूर्ण 8,901 रुपये ऑफ मिळत आहेत. यानंतर, अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. ज्यामुळे हा आयफोन कमी किंमतीत मिळू शकतो.

बँक ऑफर -

जर तुम्ही आयफोन 14 खरेदी करण्यासाठी एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 66,999 रुपये होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील तुम्हाला मिळू शकते.

आयफोन 14 एक्सचेंज ऑफर -

आयफोन 14 वर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना आयफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. परंतु 33 हजारांची संपूर्ण सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. जर तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर या आयफोनची किंमत 33,999 रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT