Instant Electric Water Heater Saam Tv
लाईफस्टाईल

Instant Electric Water Heater : थंडी पडण्याआधी गरम पाण्याची स्वस्तात सोय करा, फक्त 1500 रुपयांत हे प्रोडक्ट विकत घ्या

Water Heater Tap : ऑक्टोबर मिड सुरू आहे आता थोड्याच दिवसांत गुलाबी थंडीनेही दार ठोठावेल.

Shraddha Thik

Instant Electric Water Heater Tap :

ऑक्टोबर मिड सुरू आहे आता थोड्याच दिवसांत गुलाबी थंडीनेही दार ठोठावेल. या थंडीच्या काळात लोकांना आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज भासते. अशा स्थितीत अनेकजण गिझर किंवा हिटरच्या शोधात असतात.

तुम्हीही पाणी गरम करण्यासाठी प्रोडक्ट (Product) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुमच्यासाठी एक वॉटर हिटर घेऊन आलो आहोत जो तुमच्या खिशालाही परवडणारा आहे. त्या गीझरने तुमचे पाणी लगेच गरम होईल. यासाठी तुम्ही झटपट इलेक्ट्रिक वॉटर (Water) हीटर वापरू शकता.

हे बाजारातून ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करता येईल. हे विकत घेतल्यास गिझरची गरज भासणार नाही. ज्यामध्ये तुम्हाला पाणी गरम करण्यासाठी तासन्तास थांबावे लागणार नाही. पाणी लगेच गरम होईल.

वॉटर हीटर टॅपमध्ये बरेच पर्याय आहेत

वास्तविक गीझर बसवायचे असेल तर घरात तोडफोज करावी लागते. हे करणे खूप नुकसान कारक ठरते. वॉटर हीटरच्या टॅपमध्ये अशी कोणतीही समस्या होत नाही. नळ बसवल्यानंतर वरच्या बाजूला चालू करताच गरम पाणी येते. वापरकर्त्यांना वॉटर हीटर टॅपमधील तापमान बदलण्याचा पर्याय देखील मिळतो.

यामध्ये वापरकर्ते कमी किंवा जास्त तापमान सेट करू शकतात. यामुळे वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार कमी-अधिक प्रमाणात गरम पाणी घेऊ शकतात. यात शॉकप्रूफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये यूजर्सला इलेक्ट्रिक शॉक बसण्याची शक्यता कमी आहे. हे एक लहान प्रोडक्ट आहे. जो टॅपमध्ये सहज बसता येतो.

Amazon वरून खरेदी करू शकता

झटपट पाणी गरम करणारा हा इलेक्ट्रॉनिक वॉटर हीटर टॅप नुकताच Amazon वर दिसला. हे छोटे डिव्हाइज तुम्ही ऑनलाइनही खरेदी करू शकता. त्याची किंमत फक्त 999 रुपये आहे. तुम्ही Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त सवलत मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT