Instagram Facebook Cross Platform Messaging SAAM TV
लाईफस्टाईल

Facebook - Instagram Feature : फेसबुक-इन्स्टाग्राम यूजर्ससाठी महत्वाची अपडेट, खास फीचर होणार बंद

Facebook Cross Platform Messaging : फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. मेटा (Meta) लवकरच एक 'खास सुविधा' बंद करणार आहे.

Saam TV News

Facebook - Instagram Feature Update News, Facebook Cross Platform Messaging :

फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. मेटा (Meta) लवकरच एक 'खास सुविधा' बंद करणार आहे. कंपनीनं अधिकृतरित्या याबाबतची घोषणा केली आहे.

मेटा कंपनीने (Meta Company) क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग हे फीचर लाँच केले होते. या फीचरच्या मदतीनं यूजर्स हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर इतर यूजर्सच्या मेसेजला क्रॉस प्लॅटफॉर्मवर देत होते. मात्र, आता ते बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. (Tech News)

तीन वर्षांपूर्वी कंपनीने ही सुविधा सुरू केली होती. आता हे फीचर बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. याचाच अर्थ फेसबुकवर येणाऱ्या मेसेजला फेसबुक मेसेंजरद्वारेच उत्तर देता येईल. (Facebook Messenger)

इन्स्टाग्रामबाबतही हा निर्णय असेल. इन्स्टाग्रामवर (Instagram) येणाऱ्या मेसेजला याच प्लॅटफॉर्मवरून उत्तर द्यावा लागणार आहे. मात्र, हे खास फीचर बंद करण्यामागील कारण कंपनीने सांगितलेले नाही.

कधीपासून बंद होणार हे फीचर?

मेसेंजरवर एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर येऊ घातलेला असतानाच मेटाने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच वर्षीच्या अखेरीपर्यंत एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर येऊ शकतं, असा अंदाज आहे. क्रॉस अॅप कम्युनिकेशन चॅट हे फीचर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बंद केले जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनीच्या माहितीनुसार, हे फीचर डिसेबल झाल्यानंतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर यूजर्स अन्य प्लॅटफॉर्मवरील मेसेजचे उत्तर देऊ शकत नाहीत. पण ते मेसेज वाचू शकतात. यूजर्सना चॅट हिस्ट्रीही मिळू शकेल. हे फीचर बंद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरून फेसबुक यूजर्ससोबत चॅट करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना

Axar Patel: अक्षर पटेलने केली मॅच फिक्सिंग? दिल्ली-पंजाब सामन्यात नेमकं झालं काय? वाचा

PM Modi Convoy Size : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ दिवसात मान्सून दाखल होणार, वाचा नेमका अंदाज काय?

Gold Rate Today: दरवाढीचा भडका! चांदी ३० हजारांनी महागली, तर सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT