How to transfer confirmed train ticket to another person in Indian Railways saam tv
लाईफस्टाईल

Railway News : ट्रेनचे कन्फर्म तिकीट असूनही प्रवास शक्य नाही? मग दुसऱ्या व्यक्तीला करता येईल का प्रवास ? जाणून घ्या रेल्वेचे नियम

IRCTC ticket transfer : भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार काही विशिष्ट अटींवर तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.

Saam Tv

अनेकदा काही महिने आधी नियोजन करून रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवले जाते. मात्र, ऐनवेळी काही कारणांमुळे प्रवास रद्द करण्याची वेळ येते. अशा वेळी तिकिटाचे पैसे वाया जाण्याची चिंता सतावते. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतीय रेल्वेच्या नियमानुसार तुमचे कन्फर्म तिकीट कुटुंबातील दुसऱ्या सदस्याच्या नावावर हस्तांतरित करता येऊ शकते? मात्र, यासाठी रेल्वेने काही अटी आणि नियम निश्चित केले आहेत.

दुसऱ्या कोणाच्या नावावर तिकीट करता येते?

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार कन्फर्म तिकीट कोणत्याही व्यक्तीला थेट देता येत नाही. हे तिकीट केवळ कुटुंबातील ठरावीक सदस्यांच्या नावावर हस्तांतरित करता येते. म्हणजेच, तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मित्र, शेजारी किंवा दूरच्या नातेवाइकाला देऊ शकत नाही. तिकीट हस्तांतरित करण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची लेखी मंजुरी घेणे आवश्यक आहे. यासाठी नियोजित रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या किमान २४ तास आधी अर्ज करावा लागतो. विद्यार्थी, लग्नाची वरात आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम काही विशिष्ट गटांसाठी रेल्वेने तिकीट हस्तांतरणाचे स्वतंत्र नियम तयार केले आहेत.

शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी

शाळा किंवा महाविद्यालयाच्या सहलीसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावात बदल करायचा असल्यास, संस्थेच्या प्रमुखांनी लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज रेल्वे सुटण्याच्या किमान ४८ तास आधी करावा लागतो.

लग्नाच्या वरातीतील प्रवासी

लग्नाच्या वरातीतील एखाद्या व्यक्तीला प्रवास करणे शक्य नसल्यास, वरातीच्या प्रमुख व्यक्तीला त्या जागी दुसऱ्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येतो. यासाठी रेल्वे सुटण्याच्या किमान ४८ तास आधी अर्ज करणे आवश्यक आहे.

सरकारी कर्मचारी

सरकारी कामासाठी प्रवास करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांनी रेल्वे सुटण्याच्या किमान २४ तास आधी लेखी विनंती करणे आवश्यक आहे.

तिकीट हस्तांतरण करताना हे दोन नियम लक्षात ठेवा

  • एका कन्फर्म तिकिटावरील प्रवाशाचे नाव केवळ एकदाच बदलता येते. एकदा नाव बदलल्यानंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर तिकीट हस्तांतरित करता येत नाही.

  • विद्यार्थी, लग्नाची वरात गटातील एकूण प्रवाशांपैकी जास्तीत जास्त १० टक्के प्रवाशांचीच नावे बदलता येतात.

कन्फर्म तिकिटावरील नाव कसे बदलायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

  • सर्वप्रथम आपल्या प्रवासाच्या श्रेणीनुसार रेल्वे सुटण्याच्या २४ किंवा ४८ तास आधी नाव बदलण्यासाठी लेखी अर्ज तयार करा.

  • अर्जासोबत मूळ कन्फर्म तिकीट, स्वतःचे ओळखपत्र, ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे त्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि दोघांमधील नातेसंबंधाचा पुरावा जोडावा.

  • त्यानंतर जवळच्या मोठ्या रेल्वे स्थानकावर जाऊन मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांची भेट घ्यावी.

  • रेल्वे अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर नियमानुसार तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

प्रवास रद्द झाला म्हणून कन्फर्म तिकीट दुसऱ्या व्यक्तीला थेट देऊन प्रवास करता येत नाही. त्यासाठी रेल्वेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी अडचण येऊ नये, यासाठी प्रवासापूर्वीच संबंधित प्रक्रिया पूर्ण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी रवाना होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली भेट

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, आव्हाड राज्याच्या मंत्रिमंडळात? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला?

दुबईमध्ये भव्य दिवाळी सोहळा, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजारो मराठी रसिकांची उपस्थिती; अवधूत गुप्तेंच्या गाण्यांची मैफील रंगली

Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! आता मेसेज फक्त एकदाच पाहता येणार; जाणून घ्या कसं वापरायचं

SCROLL FOR NEXT