Indian Coast Guard Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Indian Coast Guard Recruitment 2023: बारावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी मेगाभरती, असा करा अर्ज

भारतीय तटरक्षक दलात मेगाभरती : भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

कोमल दामुद्रे

How To Apply For Indian Coast Guard Job :

बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशसेवा करु पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी म्हणता येईल. या भरतीची जाहिरात इंडियन कोस्टगार्डच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे.

दरवर्षी भारतीय तटरक्षक दलात मेकॅनिक / नाविक या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक, नाविक आणि मेकॅनिकल या पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्ज कसा कराल, शेवटची तारीख कोणती हे जाणून घेऊया

1. रिक्त जागा

  • भारतीय तटरक्षक दलात ३५० जागा रिक्त आहेत.

  • नाविक : २६० पदे

  • खलाशी : ३० पदे

  • मेकॅनिकल: २५ पदे

  • मेकॅनिकल (इलेक्ट्रिकल): २० पदे

  • मेकॅनिकल (इलेक्ट्रॉनिक्स): १५ पदे

2. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता

  • या भरती (Recruitment) मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रता ही विज्ञान क्षेत्रातून (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह)१२ वी पास हवा आहे.

  • तसेच १० वीतून संबंधित क्षेत्रात डिप्लोमा उत्तीर्ण असायवा हवे.

3. वयोमर्यादा

अर्ज (Apply) करण्यासाठी उमेदवारांचे वय हे १८ ते २२ वर्षापर्यंत असायला हवे.

4. अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी ३०० रुपये (Money) भरावे लागतील तर राखीव प्रवर्गासाठी सूट देण्यात येईल.

5. अर्ज करण्याची दिनांक

उमेदवार ८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ च्या कालावधीत अर्ज करु शकतात.

6. कसा कराल अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT