Ind vs Aus Final Match Saam tv
लाईफस्टाईल

Ind vs Aus Final Match : भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहाताना अचानक नेट संपलं तर..., फायनल मॅच पाहण्यासाठी किती डेटाची गरज?

India vs Australia, World Cup Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

कोमल दामुद्रे

Data Booster :

अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडिअमवर क्रिकेटचा सामना १९ नोव्हेंबरला रविवारी खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

त्यामुळे ही मॅच पाहाण्यासाठी सगळेच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, यापैकी अनेकांना मॅचचे तिकीच मिळाले नसेल किंवा ते खिशाला परवडणारे नसेल यामुळे तुम्ही देखील घरी बसून मॅच पाहाणार असाल तर किती डेटाची गरज लागेल हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वर्षी वर्ल्डकप डिज्नी+हॉटस्टारवर मोफत स्ट्रीमिंग करत आहे. त्यामुळे मागच्या काही सामन्यांमध्ये या प्लॅटफॉर्मने व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. भारत (India)-न्यूझीलंड सेमी-फायनलचा सामना जवळपास ५ कोटी लोकांना ऑनलाइन (Online) पाहिला होता.

जर तुम्ही देखील फायनल मॅच ऑनलाइन पाहाणार असाल आणि मध्येच डेटा संपला तर काय कराल? हा संपूर्ण सामना पाहाताना साधारणपणे किती डेटाची गरज लागेल हे पाहूया.

ज्यांच्याकडे वायफाय आहे अशा युजर्सना चिंता करायची गरज नाही. परंतु, जे युजर्स फोनचा डेटा वापरत असतील त्यांना मॅच पाहाताना अडचण येऊ शकते. हल्ली सगळेच मोबाइल (Mobile) रिचार्ज हे १.५ जीबी ते २ जीबी पर्यंत दिवसाला डेटा देतात. ज्यामुळे अवघ्या काही तासात तुमचा संपूर्ण डेटा संपेल. यासाठी तुम्हाला कोणता रिचार्ज करावा लागेल हे जाणून घ्या.

सध्या वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म हे वेगवेगळ्या प्रमाणात डेटा देतात. पण डिज्नी+हॉटस्टारचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी फुल HD मध्ये मॅच पाहायची असेल तर तासाला 1.3 GB डेटा युज केला जातो. 720p वर पाहात असाल तर 639 MB वापरला जातो. तर 360p व्हिडिओ सेटिंगवर एका तासाला 249 MB डेटाची गरज लागते.

तुम्हाला संपूर्ण मॅच न चुकता पाहायची असेल तर तुमच्याकडे १२ जीबी डेटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला एअरटेल, जिओ आणि व्होडाफोनसारख्या कंपनीचा रिचार्ज करावा.

यामध्ये एअरटेल १२ जीबीसाठी ११८ रुपये, जिओमध्ये १२ जीबीसाठी १२१ रुपये तर व्होडाफोन-आयडिया सारखी कंपनी तुम्हाला १२ जीबी डेटा पॅकसाठी ११८ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच हे तिन्ही पॅक तुम्हाला २८ दिवस वापरता येऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT