भारतातही आहे बरमुडा ट्रॅंगल; इथे जाणारा परत कधीही येत नाही  Saam tv
लाईफस्टाईल

भारतातही आहे बरमुडा ट्रॅंगल; इथे जाणारा परत कधीही येत नाही

तिबेटियन भाषेतील 'काल विज्ञान' या पुस्तकात या ठिकाणाचा उल्लेख सापडतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्यामागचे कारण आपल्याला ठाऊक नसते. पृथ्वीवरदेखील (World) अशीच काही रहस्यमयी ठिकाणे आहेत. ज्याबद्दल आपल्याला फार काही माहिती नसेल. तूम्ही अनेकदा बरमुडा ट्रॅंगल (Bermuda Triangle) बद्दल वाचले असेल, पाहिले असेल, याठिकाणी गेलेली कोणतीही वस्तू असो वा माणूस आजपर्यंत परत आलेला नाही, असे अनेक संशोधक सांगतात. पण भारतातही (India) असेच एक ठिकाण आहे. हे तुम्हाला माहित आहे का, याठिकाणी गेलेला माणूस परत आलेला नाही, अशा अनेक घटना घडल्याचे या ठिकाणी सांगितले जाते. (India also has the Bermuda Triangle; The one who goes here never comes back)

भारतातील अरुणाचल (Arunachal Pradesh) प्रदेश आणि तिबेटच्यामधे (Tibet) एक रहस्यमय दरी वसली आहे, जिचा आजपर्यंत कोणालाही शोध लागला नाही. हे ठिकाण 'शांग्री-ला खोरे' (Shangri-La Valley) म्हणून ओळखले जाते. शांग्री-ला खोऱ्यात वेळ थांबते आणि लोकांना पाहिजे तितके वर्ष ते जगू शकतात, आतापर्यंत जगभरातील अनेक संशोधकांनी या खोऱ्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे, पण आजपर्यंत कोणालाही या खोरे शोधण्यात यश आले नाही. प्रख्यात तंत्र साहित्य लेखक अरुण कुमार शर्मा यांनीही आपल्या 'दॅट मिस्टरियस व्हॅली ऑफ तिबेट' या पुस्तकात या जागेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते जगात अशा काही जागा आहेत जिथे एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे अस्तित्व जगापासून नाहीसे होते. शांग्री ला व्हॅली हीदेखील बरमुडा ट्रॅंगलप्रमाणेच आहे.

- शांग्री-ला खोरे एक काल्पनिक ठिकाण

तिबेटियन भाषेतील 'काल विज्ञान' या पुस्तकात या दरीचा उल्लेख सापडतो. जेम्स हिल्टन नावाच्या लेखकानेही आपल्या 'लॉस्ट होरायझन' या पुस्तकात या रहस्यमय जागेबद्दल लिहिले आहे.परंतु त्यांच्या मते ही एक काल्पनिक जागा आहे. तिबेटी विद्वान युत्सुंग यांच्या मते ही दरी काही अंतराळातील जगाशी संबंधित आहे. ही दरी आध्यात्मिक क्षेत्र, तंत्र साधना किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या लोकांसाठी तसेच जगभरातील संशोधकांसाठी प्रसिद्ध आहे. तथापि अशा अनेक दाव्यांनंतर आणि संदर्भानंतरही कोणीही अद्याप शांग्री-ला खोऱ्याचे रहस्य सोडवू शकलेला नाही.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत; CM फडणवीसांचं झ्युरिचमध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

आई मला वाचव, श्वास घेता येत नाहीये; कारमध्ये वाढदिवसाची पार्टी करताना अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT