Satrangi Biryani Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Satrangi Biryani Recipe : घरच्या घरी ट्राय करा झटपट सोप्या पद्धतीने सतरंगी बिर्याणी, स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहा स्पेशल रेसिपी

Satrangi Biryani : जाणून घेऊया सतरंगी बिर्याणी बनवण्याची सोपी रेसिपी.

कोमल दामुद्रे

Independance Day Special Recipe : सतत तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. बाहेर पडणारा पाऊस अन् वातावरणातील गारव्यामुळे आपल्याला चमचमीत व झटपट बनेल असे पदार्थ खायचे असतात.

विशेषत: लहान मुलांना कोणतेही पदार्थ दिले खायला तरी ते कंटाळा करतात. अशावेळी जर तुम्हाला असे वाटत असेल की, मुलांच्या पोटात सगळे पदार्थ जायला हवे. तर तुम्ही सतरंगी बिर्याणी ट्राय करु शकता.

भाजी भात (Rice) जवळपास रोजच बनवला जातो, मग आजच स्वयंपाकघरात ठेवलेल्या या रोजच्या पदार्थांनी काहीतरी वेगळे बनवू नये. अन्न चविष्ट तसेच पौष्टिक असावे. अशा परिस्थितीत तुम्ही व्हेज बिर्याणी बनवू शकता. तुम्हाला शाकाहारी बिर्याणीमध्ये काही वेगळी चव हवी असेल तर तुम्ही सतरंगी बिर्याणी ट्राय करू शकता. सतरंगी बिर्याणी खायला खूप चविष्ट असते. भूक लागल्यावर ही डिश एका झटक्यात तयार होते.चला जाणून घेऊया सतरंगी बिर्याणी बनवण्याची सोपी रेसिपी.

1. साहित्य-

गाजर (Carrot), फ्रेंच बीन्स, भोपळी मिरची, ब्रोकोली, बीटरूट, हिरवी झुची, बिर्याणी तांदूळ, कांदा, दही, मीठ, पुदिना, देशी तूप, काजू पेस्ट, हळद (Turmeric), लाल तिखट, हिरवी मिरची पावडर, वेलची पावडर, केशर पाणी, हिरवी मिरची, गरम मसाला, तेल

2. कृती

  • सतरंगी बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्यांचे तुकडे करून बाजूला ठेवा.

  • आता तांदूळ सुमारे 80 टक्के शिजवा.

  • भाज्या एका भांड्यात ठेवा. त्यात हळद, दही, काजू पेस्ट, तिखट, केशर पाणी, पुदिन्याची पाने, कांदा घालून चांगले मिक्स करावे.

  • त्यात शिजवलेला भात, देशी तूप आणि गरम मसाला पावडर घाला.

  • आता हे भांडे बंद करा आणि ओव्हनमध्ये 15 मिनिटे ठेवा. तुमची स्वादिष्ट सतरंगी बिर्याणी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT