Child food mental and physical growth, Child care, child food ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी या पदार्थांचे सेवन आहारात करा

वाढत्या वयानुसार मुलांच्या आहारात हे पदार्थ द्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : वाढत्या वयानुसार मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत आपण बदल करायला हवे. मुलाच्या मेंदूच्या वाढीसाठी त्यांना पोषणांची अधिक गरज असते. पौष्टिक अन्नपदार्थाचा मुलांच्या मेंदूवर सकारात्मक प्रभाव पडतो.

हे देखील पहा -

वाढत्या वयात मुलांना संपूर्ण आरोग्यासाठी आहारात खजिना हवा असतो. त्याच्या वाढीसाठी त्यांना संपूर्ण आणि निरोगी आहारामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूला पोषण देतात आणि तणाव किंवा चिंतापासून बचाव करतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी त्यांना योग्य तो आहार द्यावा.

१. मुलांच्या आहारात अंड्याचा समावेश करा. प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अंड्यांमध्ये मुलांची एकाग्रता आणि लक्ष वाढवण्याची शक्ती असते. अंड्यातील पिवळ बलक मेंदूचे कार्य सुधारते आणि संवाद कौशल्य देखील सुधारते. तसेच अंडी खाल्ल्याने दिवसभर मुलाला आनंदी आणि उत्साही ठेवते.

२. माशांमध्ये ओमेगा-३ फॅट्स, आयोडीन आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात. मासे खाल्ल्याने मुलाचा मूड नियंत्रित येतो आणि त्यांची स्मरणशक्ती देखील सुधारेल. त्यासाठी मुलांच्या आहारात माशांचा समावेश करा.

३. मुलांना फळांमध्ये बेरी खाण्यास द्या. बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाची संयुगे असतात जी मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली असतात. बेरीचे सेवन केल्याने मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो. तसेच मुलांच्या मेंदूला गती मिळते.

४. आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक हिरव्या भाज्या. मुलांच्या मेंदूसाठी हिरव्या भाज्या आवश्यक असतात. पालेभाज्यांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन ई आणि के सारखी पोषक तत्व असतात, जी मुलाच्या मेंदूचे संरक्षण करतात. त्यासाठी मुलांच्या आहारात पालेभाज्याचा समावेश करा.

५. डायफ्रुट्समध्ये व्हिटॅमिन (Vitamins) ई, झिंक, फोलेट, लोह आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात. हे मुलांच्या मेंदूला चालना देतात. स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मुलांच्या मूड स्विंग्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. मुलांना (Child) तणावमुक्त आणि आनंदी ठेवतात. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Romantic Zodiac Sign Boys: या 4 राशींची मुलं असतात रोमॅटिंक, मुली स्वत:हून त्यांच्यावर होतात इम्प्रेस

Nagpur : 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते…'; विवाहित महिलेने आयुष्य संपवलं, नागपुरात खळबळ

राज्यात चाललंय काय? नगसेवकाकडून तिघांवर कोयत्याने वार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Ladki Bahin Yojana: एप्रिल महिना सुरु; तरी मार्चचा हप्ता मिळाला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT