वृत्तसंस्था: खूप लोक ऑनलाइन पद्धतीने फूड ऑर्डर करत असतात. झोमॅटो(Zomato) या अॅपचा वापर करून लोक अनेक डिश ऑनलाइन (Online) पद्धतीने ऑर्डर करत असतात. मागील वर्षी ग्रोसरी डिलीव्हरी (Delivery) सुविधा सुरू केल्यावर आता झोमॅटो लवकरच १० मिनीटांमध्ये फूड डिलेव्हरी देणार आहेत. या नव्या फिचरला झोमॅटो इंन्स्टंट (Zomato Instant) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल (Deepinder Goyal) यांनी या नव्या फिचरबविषयी माहिती दिली आहे.
हे देखील पहा-
झोमॅटोचे सह संस्थापक दीपिंदर गोयलने काल ट्विटरवर (Twitter) एका नव्या फिचरची यावेळी घोषणा केली आहे. हे फिचर पुढच्या महिन्यामध्ये गुरूग्राममध्ये लाँच (Launch) करण्यात येणार आहे. नव्या फीचरमध्ये डिलिव्हरी एजंटच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे, असे दीपंदर गोयल यांनी यावेळी सांगितले आहे.
असा असणार नवीन फिचर
नव्या फिचरविषयी दीपिंदर गोयल यांनी सांगितले आहे की १० मिनीटांमध्ये डिलीव्हरी करणाऱ्या या सिस्टीम (System) काऊंटरच्या नेटवर्कचे काम सुरू आहे. हे काऊंटर जिथे जास्त प्रमाणामध्ये फूड ऑर्डर केले जाते, अशा परिसरात असणार आहे. ज्यामुळे ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना गरम आणि ताजे अन्न मिळणार आहे.
नव्या फिचरविषयी दीपिंदर यांनी सांगितले आहे की, अनेकवेळा आम्ही असे बघितले आहे की कस्टमर ऑर्डर (Order) देत असताना सर्वात लवकर कुठल्या हॉटेलमधून फूर डिलेव्हरी मिळणार आहे, या गोष्टचा विचार करत असतात. यामुळे आम्ही हे फिचर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.