High Blood Pressure 
लाईफस्टाईल

High Blood Pressure: ब्लड प्रेशरची औषधं अचानक घेणं थांबवलं तर...; असं करणं किती असू शकतं धोकादायक?

High Blood Pressure: ब्लड प्रेशरची औषधं अचानक बंद केल्याने काय होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सतत गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र अनेकदा काही कारणामुळे गोळ्या घेण्याचं आपण विसरून जातो. कित्येकदा सलग दोन ते तीन दिवस असंच सुरु राहतं. पण ब्लड प्रेशरची औषधं अचानक बंद केल्याने काय होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

जर तुम्ही ब्लड प्रेशरचे रूग्ण असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, एखादवेळी असं करू शकता. कारण अचानक ब्लड प्रेशरची औषध बंद केल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याचा धोका असतो.

कोणत्या व्यक्तींना असतो उच्च रक्तदाबाचा धोका

सामान्यपणे ब्लड प्रेशरची औषधं ही आयुष्यभर घ्यावी लागतात. मात्र ज्या व्यक्तींना हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांना तपासणीनंतर डॉक्टर काही काळ औषध बंद करतात. वजन वाढणं, धूम्रपान करणं, मद्यपान करणं, जास्त मीठ खाणं तसंच अधिक ताण घेणं या व्यक्तींना हाय बीपीचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो.

उच्च रक्तदाबाची औषधं अचानक घेणं बंद करणं योग्य की अयोग्य हे तुमच्या बीपीच्या कारणावर अवलंबून आहे.

  • रक्तदाबाची औषधं बंद केल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम

  • ही औषधं बंद केल्यानंतर समस्या अजून वाढण्याची शक्यता असते.

  • औषधं बंद केल्यास तुम्हाला साइड इफेक्ट्स जसं की, छातीत दुखणं, अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढणं, बोटांना सूज येणं हे जाणवू शकतात.

  • याशिवाय ज्यांना त्रास जास्त असेल आणि त्यांनी औषधं बंद केली तर त्यांना हॉर्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी फेल्युअरचा त्रास होऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT