kidney cancer 7 symptoms saam tv
लाईफस्टाईल

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

kidney cancer 7 symptoms: किडनीचा कॅन्सर हा गंभीर आजार असून त्याची लक्षणं वेळेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरात काही बदल दिसल्यास ते दुर्लक्षित करू नयेत.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा मानला जातो. यामधील एक अवयव म्हणजे आपली किडनी. किडनीचं महत्त्वाचं काम म्हणजे रक्त फिल्टर करणं आणि शरीरातील टॉक्सिन पदार्थ आणि अतिरिक्त द्रवपदार्थ काढून टाकणं. ज्यावेळी एखाद्या आजाराचा प्रभाव किडनीवर पडतो तेव्हा त्याचं आरोग्य बिघडू लागतं.

किडनी कॅन्सर हा असाच एक धोकादायक आजार आहे. किडनीच्या कॅन्सरचं सुरुवातीच्या काळात निदान करणं काहीसं कठीण असतं. लोक बऱ्याचदा किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नंतर हा आजार वाढतो आणि जीवघेणा ठरतो. अशावेळी शरीरात दिसणारी लक्षणं आपण वेळेत ओळखली पाहिजेत. ही लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया.

लघवीतून रक्त येणं

किडनीच्या कॅन्सरचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवीमध्ये रक्त दिसणं. सुरुवातीला हे याची मात्रा कमी असते परंतु हळूहळू त्याचं प्रमाण वाढतं. जर ही समस्या कायम राहिली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.

कंबरेच्या खालील भागात वेदना

जर तुमच्या कंबरेचा खालचा भाग सतत दुखत असेल तर सावध व्हा. आराम करून देखील हा भाग बरा होत नसेल तर ते किडनीच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.

सतत थकवा

जेव्हा किडनी योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरातून टॉक्सिन पदार्थ बाहेर पडत नाही. अशावेळी अशक्तपणा आणि थकवा येतो . जर तुम्हाला विश्रांती घेतल्यानंतरही फ्रेश वाटत नसेल तर ही चिंतेची बाब आहे.

वजन वेगाने घटणं

डाएट किंवा कोणताही व्यायाम न करता तुमच्या वजनात घट होत असेल तर हे देखील किडनीच्या कॅन्सरचं एक लक्षण आहे. हे शरीरात कॅन्सरच्या पेशींमध्ये जलद वाढ होत असल्याचे संकते आहेत.

भूक कमी लागणं

किडनीचा कॅन्सर असलेल्या रुग्णांना अनेकदा भूक लागत नाही. इतकंच नाही तर त्यांना वारंवार मळमळ वाटत राहते. हे शरीरात टॉक्सिन पदार्थ जमा झाल्यामुळे होतं.

पोटाच्या बाजूला गाठ लागणं

जर तुम्हाला तुमच्या पोटात किंवा बाजूला कडक गाठ वाटत असेल तर ते किडनी ट्यूमरचं लक्षण असू शकते. जर तुम्हाला असं दिसून आलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

सतत ताप येणं

किडनीच्या कॅन्सरच्या रुग्णांना वारंवार ताप येऊ शकतो. हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद मानला जातो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT