Kidney damage saam tv
लाईफस्टाईल

Kidney damage: शरीरात हे 5 बदल दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा; किडनी खराह होण्यापूर्वी दिसतात लक्षणं

Early Warning Signs of Kidney Disease: किडनी शरीरातील रक्त फिल्टर करण्यासह अनेक महत्त्वाची कार्ये करते. मात्र, किडनीचे कार्य बिघडल्यास चेहऱ्यावर सूज, लघवीत फेस, त्वचेला खाज, थकवा आणि तोंडाला दुर्गंधी अशी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. केवळ रक्त फिल्टर करणं नाही तर pH बॅलंन्स, पोटॅशिमय, सोडियमचं प्रमाण आणि मिनरल्स यांचं प्रमाण देखील कंट्रोल करण्यास किडनी मदत करते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही आजार, लाईफस्टाईल आणि जेनेटिक कारणं किडनीच्या क्षमतेवर परिणाम करतात. ज्यावेळी किडनीचं कार्य योग्य पद्धतीने होत नाही त्यावेळी ती नीट रक्त फिल्टर करू शकत नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला डायबेटीज किंवा ब्लड प्रेशरची समस्या आहे तर किडनीच्या समस्येचा धोका वाढतो. lifesavertraining युकेच्या अहवालानुसार, किडनी खराब झाल्यानंतर जी काही लक्षणं दिसून येतात ती फार किरकोळ असतात. ही लक्षणं पटकन लक्षात न येणारी असल्याने त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. ही लक्षणं कोणती असतात ते पाहूयात.

चेहऱ्यावर सूज येणं

जर सकाळी उठल्यावर तुमच्या चेहऱ्यावर अचानक सूज दिसून आली तर ही सामान्य गोष्ट नाहीये. याशिवाय जर तुमच्या पायांवरही सूज दिसत असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, किडनीमधून टॉक्सिन पदार्थ बाहेर पडत नसल्याचं हे एक लक्षण असतं. अशावेळी शरीराला सूज येऊ लागते.

लघवीमध्ये फेस दिसणं

सकाळी पहिल्यांदा लघवी केल्यानंतर जर त्यामध्ये फेस दिसत असेल तर ही किडनीसंदर्भातील समस्या असून शकते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर लघवीतून गरजेपेक्षा जास्त प्रमाणातून प्रोटीन बाहेर पडत असेल तर फेस येण्याची समस्या दिसून येते. याचा अर्थ तुमची किडनी कमकुवत होत असल्याचं लक्षण आहे.

त्वचेला प्रचंड खाज येणं

ज्यावेळी किडनी खराब होऊ लागते तेव्हा त्यामध्ये टॉक्सिन जमा होऊ लागतात. अशावेळी त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे त्वचेला अधिक खाज येण्याची समस्या होऊ लागते. जर मॉइस्चरायझर लावून देखील हा त्रास कमी होत नसेल तर हे किडनीच्या समस्येचा गंभीर संकेत असू शकतो.

ब्रेन फॉग आणि थकवा

किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर रक्तामध्ये नको असलेले घटक जमा होऊ लागतात. ज्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवू लागतो. पुढे ही समस्या गंभीर किडनीच्या समस्येमध्ये रूपांतरीत होते. अशात जास्त प्रमाणात रक्ताची कमतरता जाणवल्यास एनिमियाचा त्रासही होऊ शकतो.

सकाळी तोंडाला दुर्गंधी येणं

जर तुमच्या तोडांतून वारंवार दुर्गंधी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी किडनी तिचं कार्य योग्य पद्धतीने करू शकत नाही तेव्हा विषारी घटक रक्तात जमा होऊ लागतात आणि श्वासावाटे ते बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI New Rules : बँक खात्याशिवाय पाठवता येणार ५० हजार रुपये; RBI चे नवे नियम लागू

Neck Pain Relief : उशीमुळे मान आखडतेय? कापसासारखी उशी मऊ करण्यासाठी ट्राय करा 3 सोप्या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: मावळतील नॅशनल इंजिनिअरिंग हेवी कंपनीचे 15 तारखेला करणार गृहमंत्री अमित शहा भूमिपूजन

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना विलीन होणार, भाजप प्रवक्तव्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT