Sleep disorder, sleeping benefits, Do's and don't  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

झोप पूर्ण न झाल्यास आपण पडू शकतो या व्यसनांना बळी!

दिवसभरातील काम व थकव्यामुळे विश्रांतीची गरज आपल्यापैकी सगळ्यांना असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिवसभरातील काम व थकव्यामुळे विश्रांतीची गरज आपल्यापैकी सगळ्यांना असते. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास आपली सतत चिडचिड होत राहाते.

हे देखील पहा -

झोपेचे आणि आपले गणित थोडे वेगळे आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभराच्या थकव्यामुळे अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येते. तर काहींना किती ही प्रयत्न करुन झोप काही लागत नाही. अशावेळी ते काही औषधांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात.दिवसभराच्या कामामुळे आपण रात्रीची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास आपले दुसऱ्या दिवशी कामात लक्ष लागत नाही. तसेच आपल्याला काम करताना सतत डुलक्या घ्यायची सवय लागते किंवा आळस चढतो. आपली रात्रीची झोप ही निदान ७ ते ८ तासांची असायला हवी. ज्यामुळे आपला थकवा दूर होऊन आपल्याला फ्रेश वाटेल. झोप पूर्ण न झाल्यास आपण अनेक व्यसनांना बळी पडू शकतो. ती व्यसने कोणती ते पाहूया.

१. अल्कोहोल आणि गांजा यांसारखे पदार्थ आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत परंतु, सवयीमुळे आपण इच्छा असूनही ते सोडू शकत नाही. स्लीप डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेकदा तणाव जाणवतो. अशावेळी अधिक झोप घेण्यासाठी ते दारू, गांजा यासारख्या गोष्टींचे सेवन करू लागतो.

२. आपल्यापैकी बरेच लोक झोपण्यापूर्वी अलार्म लावतात पण अलार्म वाजून तो पुन्हा स्नूझ होईपर्यंत आपण पुन्हा झोपून राहते असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आपल्याला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी आपण वेळवर (Time) झोपणे गरजेचे आहे.

३. आपल्याला झोप न येत असल्यास किंवा झोपेच्या अनेक तक्रारारी असतील तर आपण वेळीच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यायला हवा. ज्यामुळे स्लीप डिसऑर्डरसारखा आजार आपल्याला जडणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT