Akshaya Tritiya 2022, Akshaya Tritiya 2022 gold Purchase Tips, gold buying tips
Akshaya Tritiya 2022, Akshaya Tritiya 2022 gold Purchase Tips, gold buying tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Akshaya Tritiya 2022: आज सोने खरेदी करत असाल तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. या दिवशी तुम्ही देखील सोने (Gold) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्या सतत वाढणाऱ्या किंमती आणि येणाऱ्या काही वर्षात त्याच्या कमी-जास्त होणाऱ्या किंमतींबद्दल जाणून घ्यायला हवे. मागच्या काही वर्षात सोन्याच्या किंमतीत प्रचंड वेगाने वाढ होताना दिसत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनासारखी (Corona) महामारी. या महामारीची स्थिती सध्या संपलेली दिसत असूनही त्याचा परिणाम अद्यापही सोन्याच्या भावावर अजूनही दिसत आहे. वाढती महागाई, भौगोलिक राजकीय तणाव, आणि केंद्रीय बँकांचे धोरण यामुळे सोन्याच्या भावावर अधिक प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. (Akshaya Tritiya 2022 Gold Purchase Tips)

हे देखील पाहा -

फायनॅशियल सर्विस कंपनीचे प्रमुख 'मोतीलाल ओसवाल' यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण जग महामारीतून सावरत होते, परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहे. सध्या बाजारात मंदी असल्यामुळे गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेता येत नाही आहे. गेल्या वर्षभरापासून चलनवाढ हा बाजारासाठी कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यातच केंद्रीय बँकांनीही सध्या व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागणी पुरवठ्यातही काही समस्या आढळून आल्या असून भारत आणि यूएई मधील सीईपीए (CEPA) करार १ मे पासून लागू झाला आहे. यावर देखील स्पष्टता येणे बाकी आहे.

यूएई सोबत करार

यूएई सोबत होणाऱ्या या कराराच्या अंमलबजावणीनंतर, पुढील एका वर्षात यूएईमधून सुमारे २०० टन सोने स्वस्त दरात येऊ शकते. या करारानुसार भारत इतर देशांच्या तुलनेत यूएईमधून एक टक्का कमी आयात शुल्क आकारणार आहे. भारतातून यूएईला जाणाऱ्या दागिन्यांवर पाच टक्के निर्यात शुल्क आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. या बदलांमुळे भविष्यात सोन्याची मागणी वाढू शकते.

तसेच सोन्याच्या मागणीत शेतीचाही महत्त्वाचा वाटा असेल. स्कायमेटने यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस सुरू राहिल्यास मागणी वाढू शकते. दरम्यान, वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घसरून १३५.५ टन झाली आहे. तथापि, ग्राहकांचा कल पुन्हा एकदा सोने खरेदीकडे वळला आहे. परंतु वाढत्या महागाईमुळे लोक अनावश्यक गोष्टींवरील खर्च कमी करतील व त्यामुळे त्याची मागणीही कमी होऊ शकते.

पुढील दृष्टिकोन काय आहे

जुने सोन्याचे दर बघितले तर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने सोन्याचे भाव थंड होऊ शकतात. तसेच युक्रेन तणावाच्या परिस्थितीलाही साथ देऊ शकत नाही. जोपर्यंत भारत आणि यूएई मधील सीईपीए करारामधील स्पष्टता येत नाही तोपर्यंत सोने एका दरात राहू शकते. पुढील काही तिमाहीत सोने कमी होऊ शकते. ५००००, ४८०००, ४६५०० ची पातळी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावासाठी सध्या कार्यरत आहे. जर सोन्याचा भाव वर गेला तर या संधीचा फायदा घेऊन ५५००० उच्चांकासाठी जाऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधव यांनी घेतली माघार

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

SCROLL FOR NEXT