उष्णतेपासून दिलासा देण्यात एसी सध्या प्रत्येकाच्या घरात अग्रस्थानी आहे
उष्णतेपासून दिलासा देण्यात एसी सध्या प्रत्येकाच्या घरात अग्रस्थानी आहे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Home Tips : तुमच्या घरीसुद्धा आहे AC; तर फॉलो करा या टिप्स...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याचे आगमन होताच घरां (Home) मध्ये एसी, कुलर, रेफ्रिजरेटर यासारख्या उत्पादनांचा वापर होत असल्याने विजेचा वापर वाढतो. उष्णतेपासून दिलासा देण्यात एसी सध्या प्रत्येकाच्या घरात अग्रस्थानी आहे, परंतु त्याच्या वापरामुळे विजेचा वापरही अनेक पटींनी वाढतो आणि विजेची लांबलचक बिले येतात. विंडो एसी असो वा स्प्लिट एसी, दोन्हीमध्ये विजेचा वापर खूप जास्त प्रमाणात होत असतो.

कडाक्याच्या उन्हात आपल्या शरीरातून घामाच्या धारा सुरु होतात. परंतु उकाड्यात आपण सतत पंखा-कूलर किंवा एसी जवळ बसून राहातो तर दुसरीकडे, आपण आपल्या एसीचा देखभालीकडे लक्ष दिले नाही, तर विजेचे बिल एक मोठे ओझे बनते जे आपले मासिक बजेट (Budget) खराब करण्यासाठी पुरेसे आहे.

एसी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

१. एसीच्या मोड्सची काळजी (Care) घ्या-

हल्ली बाजारात उपलब्ध असलेले नवीन युगातील एसी आपल्याला पाहायला मिळतात, मग ते विंडो एसी असो वा स्प्लिट एसी. आपल्याला त्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. उन्हाळ्यात एसी चालू केल्यानंतर, तुमचा एसी फक्त कुलिंग मोडवर चालत असल्याची सर्वप्रथम खात्री करा.

२. एसीच्या तापमानाची काळजी घ्या -

अनेकदा आपण अति उष्णतेमुळे एसी कमी तापमानात चालवतो आणि नंतर खोली खूप थंड झाल्यावर पुन्हा तापमान वाढवतो. तापमानात वारंवार वाढ आणि घट केल्याने ते अधिक वीज खेचण्यास सुरुवात करते. हे टाळण्यासाठी एसी प्रमाणित तापमानावर सेट करा. असे केल्याने तुमची खोलीही थंड होईल आणि वीजचे बिलही वाढणार नाही.

३. दरवाजे आणि खिडक्या बंद करा

एसी सुरू केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा की, ज्या खोलीत एसी चालवत आहात त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद आहेत ना याची एकदा खात्री करुन घ्या. एसी सुरु केल्यानंतर दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या नाहीत तर थंड हवा बाहेर पडेल आणि बाहेरून गरम हवा खोलीत येईल. त्यामुळे एसीचा भार वाढेल, आणि दुप्पट वीजवापर सुरू होईल.

४. वेळोवेळी एसीची स्वच्छता करा -

एअर कंडिशनर चालवण्यासोबतच त्याची देखभाल करणेही खूप गरजेचे आहे. एसीमध्ये असलेल्या डक्ट आणि व्हेंट्सचा सतत वापर केल्यामुळे हवेत घाण साचते. त्यामुळे एसीची थंड हवा खोलीत नीट पोहोचत नाही. याशिवाय, सतत वापरल्यानंतर एसीचा फिल्टर बदलणे खूप महत्वाचे आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी

Sahil Khan News | अभिनेता साहिल खान प्रकरणात मोठी बातमी

Jalna News: थोडक्यात मोठा अनर्थ टळला! जालन्यात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डींग!

Health Tips: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 'या' फळांचे करा सेवन

Amit Shah Fake Video: आरक्षणाबाबत अमित शहांचा बनावट व्हिडिओ; दिल्ली पोलिसांनी तेलंगणाच्या सीएमला पाठवला समन्स

SCROLL FOR NEXT