गरोदरपणात आईला कोरोना झाल्यास बाळाला होत नाही; मात्र 'या' परिणामाची शक्यता... SaamTV
लाईफस्टाईल

गरोदरपणात आईला कोरोना झाल्यास बाळाला होत नाही; मात्र 'या' परिणामाची शक्यता...

Corona चे अनेक परिणाम मानवाच्या शरीरावर होतात. याबाबत नवीन संशोधनसमोर येत आहेत. गरोदर पणाच्या कोणत्याही काळात कोरोनाची लस घेतली तरी चालते.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोरोनाबाबत (Corona) आणखी नवीन संशोधन समोर आलं आहे. गरोदरपणात आईला कोरोना झाल्यास बाळाला कोरोना होत नाही, मात्र बाळाची वाढ खुंटते अथवा कमी वजनाचे बाळ जन्माला घालण्याची वेळ येते. याबाबत संशोधन कोल्हापूर येथील पत्की रिसर्च सेंटरचे डॉ. सतीश पत्की यांनी केलं आहे.

हे देखील पहा -

कोरोनाचे अनेक परिणाम मानवाच्या शरीरावर होतात. याबाबत अनेक नवीन संशोधनसमोर येत आहेत. कोरोना च्या काळात अनेक गरोदर मातांना कोरोना झाला होता, मात्र त्याच बाळ हे कोरोना निगेटिव्ह आले. या काळात आईवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास झाला होता मात्र बाळावर काय परिणाम होतो त्याची नेमकी माहिती नव्हती. याबाबत कोल्हापूरचे प्रसिद्ध प्रसूती तज्ञ डॉ. सतीश पत्की (Dr. Satish Patki) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केलं आहे.

जानेवारी 2021 ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे संशोधन सुरू होते. सोळा महिलांच बाळाच्या जन्मानंतर संशोधन करण्यात आले. त्यामध्ये कोरोना झालेल्या महिलांच्या बाळाची वाढ पुरेशी होत नसल्याच समोर आलंय. हे संशोधन जागतिक स्तरावरील मासिकात प्रसिद्ध झाल आहे. या संशोधनात एक आशादायक गोष्टही समोर आली आहे ती म्हणजे गरोदर महिलांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली असल्यास हे परिणाम जाणवत नाहीत आणि गरोदर पणाच्या कोणत्याही काळात कोरोनाची लस घेतली तरी चालते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT