New born baby care, Vomiting in babies after feeding ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

नवजात बाळाला दूध प्यायल्यानंतर उलटी होते; तर जाणून घ्या त्यामागचे कारण

नवजात बाळाला दूध प्यायल्यानंतर उलटी होते तर ही कारणे असू शकतात.

कोमल दामुद्रे

मुंबई : बाळ जन्माला आल्यानंतर निदान काही महिने तरी ते आईचे दुध पित असते. बाळाने दुध प्यायल्यानंतर लगेच काही वेळात ते उलटी करते त्यामुळे पालकांना त्याचे टेन्शन येते.

हे देखील पहा-

नवजात बाळाला डॉक्टर सहा महिने तरी आईचे दुध पाजण्यास सांगतात. बाळ आईचे दुध प्यायल्यानंतर लगेच उलटी करते यामागे अनेक कारणे असू शकतात. बाळ काही दिवसांचे असल्यामुळे त्याला बाहेरचे वातावरण लगेच सुट होत नाही त्यामुळेही त्याला उलटी होऊ शकते. बाळाच्या उलटीमागे आईच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील असू शकताता. अधिक उष्ण पदार्थांचे सेवन, भुकेपेक्षा जास्त खाणे, खराब झालेले किंवा शिळे अन्न, कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा पोट बिघडणे यांसारख्या कारणांचा समावेश आहे. दूध प्यायल्याबरोबर बाळाला उलट्या होतात. त्यामुळे पालकांना अनेकदा काळजी वाटते. अशावेळी काळजी करण्याची गरज नाही. (Vomiting in babies after feeding)

मुलांमध्ये उलट्या होण्याची कारणे

१. लहान बाळ दूध प्यायल्यानंतर त्याच्या अन्ननलिका आणि पोट यांच्यामधील स्नायूंची रिंग कधी कधी बंद होते त्यामुळे दूध परत अन्ननलिकेत जाते आणि उलट्या होतात.

२. मुलांचे पोट खूप लहान असते, म्हणूनच त्यांच्यासाठी थोडेसे दूध पुरेसे असते. काही वेळा जास्त दूध पाजल्याने त्यांना उलट्या होतात. तसेच बाळाची पचनसंस्था नीट न झाल्यामुळे देखील त्यांना उलट्या होऊ शकतात.

३. बाळाला उलट्या सर्दी, ताप, उष्णता आणि संसर्गामुळे होऊ शकतात. अशावेळी आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशा प्रकारे दूध प्यायल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास टाळता येतो

- बाळाला (Baby) दूध देताना त्याचे प्रमाण कमी ठेवावे. बाळाला दूध पाजताना घाई करू नका, पण त्याला आरामात दूध द्या. आहार दिल्यानंतर बाळाला लगेच झोपवू नका त्याची ढेकर काढायला विसरू नका.

- बाळाला दूध (Milk) पाजताना, त्याच्या डोक्याला आणि छातीला हात लावा. बाळाला बाटलीने दूध पाजले तर लक्षात ठेवा की त्या बाटलीचे छिद्र लहान आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT